Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार यांच्या बॅगेची म्हसळ्यात निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी !

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या विधानसभेला बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बॅगची म्हसळा येथे तपासणी करण्यात आली.

  • By नारायण परब
Updated On: Nov 16, 2024 | 07:48 PM
शरद पवार यांच्या बॅगेची म्हसळ्यात निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी !
Follow Us
Close
Follow Us:

म्हसळा (वार्ताहर): राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची म्हसळा येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

शरद पवार यांनी श्रीवर्धन मतदार संघाचे महाविकास उमेदवार अनिल नवगणे यांचा प्रचारार्थ घेतलेल्या सभेसाठी हजेरी लावली होती.शरद पवार हेलिपॅडवर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.यावेळी कपडे, पाणी बॉटल, न्युज पेपर आणी महत्वाचे कागदपत्रे बॅगेत होती ही   माहिती या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता अन् त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचे टीकास्त्र

उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणीची झाली चर्चा

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा बॅग तपासण्याचा व्हिडिओ काढला होता . त्यानंतर ठाकरेंचीच बॅग का चेक केली जात आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांच्या बॅग तपासण्याचे व्हिडिओ जारी केले होते. आता शरद पवार यांची बॅगही तपासली गेली आहे.

श्रीवर्धन मतदारसंघ 

श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या,  मंत्री आदिती तटकरे या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात या मतदारसंघात शरद पवार गटाकडून अनिल नवगणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. हा मतदारसंघ सुनील तटकरेंचा बालेकिल्ला आहे. मागील तीन निवडणुकीत येथे तटकरे घराण्यातील व्यक्तीच निवडून आला आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्येही या मतदारसंघातून सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे आदिती तटकरेंचे पारडे जड असल्याचे  दिसत असले तरीही विधानसभेची समीकरणे वेगळी असू शकतात.

गद्दारांना पाडा पाडा पाडा…शरद पवारांची वाईच्या सभेत तुफान राजकीय टोलेबाजी

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

सध्या राज्यभर शरद पवार दौरे करत आहेत. त्यांचे विशेष लक्ष्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य नेत्यांच्या मतदारसंघाकडे आहे. त्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघाचाही समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट कोकणामध्ये या मतदारसंघात आणि रत्नागिरीमध्ये चिपळूण मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे हे पक्षाच्या कोकणातील अस्तित्वासाठीही हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी तितकेच महत्वाचे आहेत. आता शरद पवार यांच्या श्रीवर्धनमधील येण्याने मतदारसंघावर परिणाम होतो की सुनील तटकरे आपला बालेकिल्ला कायम ठेवतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Web Title: Checking of sharad pawars bag by election department team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 07:48 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.