Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरण,पनवेलमधून चौघांची माघार, तरीही होणार तिरंगी लढती

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पनवेल उरण मतदारसंघातून चार उमेदवारांनी माघार घेतली असली तरीही काही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढती होणार आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Nov 04, 2024 | 05:39 PM
उरण,पनवेलमधून चौघांची माघार, तरीही होणार तिरंगी लढती
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल ग्रामीण ( वा ) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पेण आणि पनवेल मधील जागा सोडण्यात आल्याची घोषणा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेत केली.त्या बदल्यात उबाठा गटाच्या उमेदवारां विरोधात शेकाप ने उभे केलेले उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील अशी घोषणा करून सुद्धा उरण विधानसभा क्षेत्रात शेकापतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रीतम म्हात्रे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नसून,पनवेल विधानसभा क्षेत्रातून उबाठा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महाविकास  आघाडीतील तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा- Maharashtra Election 2024 : कोल्हापुरात कॉंग्रेसला मोठा धक्का; मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या साठी निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या 4 नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी पनवेल विधानसभा क्षेत्रातील 2 तर उरण विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असले तरी महाविकास आघाडीने घोषित केल्या प्रमाणे पनवेल विधानसभा क्षेत्रातून उबाठा गटाने तसेच उरण विधानसभा क्षेत्रातून शेकापच्या उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेतली नसल्याने निवडणुकीतील सस्पेन्स कायम आहे.

हे देखील वाचा-Sharad Pawar : जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत, पण…; निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पनवेल मतदारसंघ 

पनवेल मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर निवडणूकीच्या रिंगणात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लीना गरड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शेकाप कडून माजी आमदार बाळाराम पाटील उमेदवार आहेत. लीना गरड यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून 2009 पासून प्रशांत ठाकूर हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये कॉंग्रेसकडून तर 2014 आणि 2019 मधून त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आहे. त्यामुळे ठाकूर कुटुंबियांचा हा मतदारसंघ गड मानला जातो. त्यामुळे भाजपचे पारडे यावेळीही जड असल्याचे दिसते आहे.

उरण मतदारसंघ

महाविकास आघाडीकडून नेमका कोणता पक्ष या मतदारसंघातून लढणार हा तिढा आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुटला नसल्याने उरण मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सध्याचे विद्यमान आमदार महेश बालदी हे भाजपचे उमेदवार आहेत. तर शिवसेना उबाठाचे माजी आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने ही लढत होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मैत्रीपूर्ण लढतीमुळे मतविभाजनाचा त्यांना तोटा होण्याची शक्यता जास्त आहे.

या मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीमुळे येथे चुरशीची लढत  होणार हे नक्की, आता मतदारराजा कोणत्या पक्षाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Web Title: Despite the withdrawal of four candidates from uran and panvel there will be a three way contest in this constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 05:04 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.