Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

माथेरान मिनीट्रेनला सुरुवात झाली असून पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याआधी रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 06, 2025 | 01:11 PM
Matheran News : अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू
Follow Us
Close
Follow Us:

अखेर मुहुर्त लागलाच

माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

 

 

 

माथेरान / संतोष पेरणे : निसर्गसौंदर्याबरोबरच माथेरानची ओळख असलेली मिनीट्रेन सुरु होण्याला मुहुर्त लागला आहे. पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन आज 6 नोव्हेंबरपासून पर्यटक प्रवासी यांच्या दिमतीस आली.नेरळ माथेरान नेरळ या पहिल्या गाडीला पर्यटकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला मात्र वातानुकूलित गारेगार प्रवास करण्यासाठी जोडण्यात आलेला विस्टाडोम डब्बा मात्र पूर्णपणे रिकामा राहिला.दरम्यान,या पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याआधी रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली.

नेरळ येथून माथेरानसाठी मिनीट्रेन सोडली जाते.नेरळ जंक्शन स्थानकातून 1907 मध्ये मिनी ट्रेन सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नेरळ माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते.यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि 15 जून रोजी पावसाळा अपेक्षित धरून बंद होणारी मिनी ट्रेन 26 मे पासून बंद करण्यात आली.त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि 15 ऑक्टोबर रोजी नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती.अजूनही सरता पाऊस सुरू असताना पर्यटक प्रवासी वर्गाची प्रचंड मागणी असल्याने मिनी ट्रेन चे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली.त्या चाचणी मध्ये 28 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळा विना पोहचली होती.त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी दोन नोव्हेंबर साठी पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनची प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने आज सहा नोव्हेंबर रोजी प्रवासी गाडी सुरू केली.तब्बल 20 दिवस उशिरा नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन सुरू होणार आहे.याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले होते.

नेरळ येथून सहा प्रवासी डब्बे लावलेली पावसाळा नंतरचे हंगामातील पहिली मिनी ट्रेन माथेरान साठी रवाना झाली.त्याआधी नेरळ स्थानकात या गाडीच्या इंजिनाची पूजा करण्यात आली.या पहिल्या गाडीचे सारथ्य अनुभवी चालक हरीश चिंचोळे यांनी केळे तर त्यांना सहाय्यक म्हणून मुकेश योगी यांनी साथ दिली.या गाडीचे गार्ड म्हणून हरदेव मीना तर तिकीट तपासनीस भगत हे होते.पहिल्या गाडी मधील द्वितीय श्रेणीची सर्व 90 तिकिटे संपली तसेच प्रथम श्रेणीची 22 तिकिटे तिकीट खिडकी उघडल्यावर काही मिनिटात संपली. पहिली तिकीट दहा जणांच्या ग्रुपने मिळविली असून या गाडी साठी लावण्यात आलेला वातानुकूलित डब्बा मात्र रिकामा राहिला.या पहिल्या गाडीला प्रभारी स्थानक प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी हिरवी झेंडे दाखवली,त्यावेळी स्थानक प्रबंधक पाटील,वाहतूक निरीक्षक अनुप कुमार सिंह,मुख्य तिकीट निरीक्षक जे जी विनोद, बिर्जन कुमार तर बुकिंग क्लार्क योगेंद्र राजावत,प्रेम चंद ऑड यांनी काम पाहिले.श्रीफळ वाढवण्याचे काम या रेल्वे मार्गाची देखभाल ठेवणारे कनिष्ठ अभियंता सानप यांनी वाहिला.

 

असा असेल प्रवास…
नेरळ येथून सकाळी मालवाहू गाडी सोडली जाणार आहे.त्यानंतर नऊ वाजता पहिली तर साडे दहा वाजता दुसरी प्रवासी गाडी नेरळ येथून माथेरान साठी सोडली जाणार आहे.तर माथेरान येथून नेरळ साठी पहिली गाडी पावणे दोन वाजता आणि दुसरी गाडी चार वाजता साठी रवाना होणार आहे.त्या दोन्ही फेऱ्यांचा कार्यक्रम मध्य रेल्वे कडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन गाड्या वाढवून देण्याची अनेक वर्षाची मागणी आताही प्रलंबित आहे.मात्र माथेरान ते अमन लॉज या दरम्यान शटल सेवा पूर्वीसारखी सुरू राहणार आहे.

नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक..
नेरळ येथून माथेरान साठी
सकाळी 08.50
सकाळी 10.25
माथेरान येथे पोहचणार..
सकाळी11.30
दुपारी 01.05

माथेरान येथून नेरळ साठी..
दुपारी 02.45
दुपारी 04.00
नेरळ येथे पोहचणार..
सायंकाळी.05.30
सायंकाळी06.40

Web Title: Matheran news matheran neral minitrain passenger service starts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • Matheran Train

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.