Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची होतेय फसवणूक; पर्यटन बचाव संघर्ष समितीचा आरोप

माथेरानमध्ये पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे एक मोठे जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 18, 2025 | 03:43 PM
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची होतेय फसवणूक; पर्यटन बचाव संघर्ष समितीचा आरोप

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची होतेय फसवणूक; पर्यटन बचाव संघर्ष समितीचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

माथेरान/संतोष पेरणे: माथेरान शहरात येणारे पर्यटक यांची शहरात फसवणूक होत असल्याचे सात्यत्याने आढळून आले आहे.शहरात आल्यावर पर्यटकांना चुकीची माहिती देणे,जास्तीचे भाडे आकारणे,शहराची माहिती चुकीच्या पद्धतींने सादर करणे असे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे एक मोठे जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. दरम्यान, पर्यटकांच्या फसवणूक प्रकरणी माथेरान मधील सर्व व्यापारी आणि हॉटेल मालक यांनी एकजूट दाखवली असून पुढील आंदोलनाची दिशा आगामी काळात निश्चित केली जाणार आहे.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने शहरात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला व्यापारी फेडरेशन तसेच हॉटेल रेस्टोरंट असोसिएशन अन्य संघटना यांचा सहभाग होता. मनोज खेडकर,कुलदीप जाधव,रत्नदीप प्रधान,हेमंत पवार,शकील पटेल,जनार्दन पार्टे,शिवाजी शिंदे,अब्बास भाई राणीवाला,सुवासिनी शिंदे,जयश्री कदम दीपक शहा नितीन शहा जुजार माथेरान वालावैभव पवार योगेश जाधव,संजय कदम,चंद्रकांत जाधव,प्रदीप घावरे,गिरीश पवार,अनंता शेलार आदी सहा अनेक व्यापारी उपस्थित होते. याप्रसंगी चर्चा होत असताना माथेरान मध्ये काही विशिष्ट लोकांकडून येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जाऊन त्यांच्या कडून अव्वाच्यासव्व्वा पैसे उकळून लूटमार केली जात आहे,तसेच माथेरान मध्ये पर्यटकांनी रात्रीचा मुक्काम न करता एक दिवसात फिरून माघारी लोणावळा, खंडाळा, इमॅजिका किंवा नेरळ कर्जत परिसरातील फार्म हाउस वर जाऊन वास्तव्य करावे असे काही लोक सुचवीत असल्याचे दिसून आले आहे.पर्यटकाला रात्रीचे घाबरवणे तसेच मिनी ट्रेन बद्दल,पर्यटकांना घोड्यावरून कुठेही उतरणे,रात्री काही भीती दाखवून येथून पिटाळून लावणे, अस्तित्वात नसलेले नवीन पॉईंट निर्माण करणे, पॉइंट्सची वगैरे चुकीची माहिती देऊन त्या पर्यटकाला माथेरानमध्ये रहाण्यापासून परावृत्त केले जात आहे.

या सर्व बाबींचा माथेरानच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला असून सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे.त्यामुळे आता वेळ आली आहे की अशा ह्या घाणेरड्या आणि माथेरानच्या मुळावर घाव घालणाऱ्या आपल्या माथेरानचे नाव स्वतःच्या आर्थिक लोभासाठी खराब करणाऱ्या सर्व नियम कायद्याची पायमल्ली करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना योग्य तो धडा शिकवायची वेळ माथेरानचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आणणाऱ्या विरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

माथेरान मध्ये पर्यटन हा एकेमव व्यवसाय असल्याने पर्यटक आले नाहीत तर माथेरानचा पर्यटन व्यवसाय कोलमडून जाईल आणि माथेरानकर लोक कसे जगणार?असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.त्यामुळे आपण नगरपरिषद मार्फत जागोजागी पर्यटकांना आवाहन करणारे बोर्ड लावत आहोत.ते बोर्ड फाडण्याचे प्रकार अनेक वेळा घडले असल्याने प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणी बोर्ड लावले जात असून ते बोर्ड फाडल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीवर देखील कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. त्या सर्व बाबत दिशा निश्चित करण्यासाठी आगामी काही दिवसात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Web Title: Tourists coming to matheran are being cheated allegation of tourism rescue sangharsh committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • matheran news
  • Tourism news

संबंधित बातम्या

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
1

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
2

Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
3

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
4

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.