वडार समाजाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित;
पनवेल/दीपक घरत : ग्रामीण ( वा ) स्थानिक विरुद्ध शहरी अशा वादाची ठिणगी पनवेलमध्ये पडली आहे. मुख्यत: असा कोणताही वाद या पुर्वी पनवेलमध्ये झाला नव्हता. मुळातच नसलेला वाद जाणीवपूर्वक पेटवून विधानसभा निवडणुकीत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न काही उमेदवार करत आहेत. अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. उमेदवारांच्य़ा या कृत्यामुळे पनवेलमधील राजकारणाची पातळी खालवल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.शहरी तसंच ग्रामीण भागाचा समावेश करून तयार करण्यात आलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रात जवळपास साडे सहा लाखा पेक्षा जास्त मतदारांची संख्या आहे.
या पैकी 68 टक्के मतदार शहरी भागातील असून 32 टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत. या मतदारसंघातील 544पैकी जवळपास 370 बूथ शहरी भागातील आहेत. परिणामी आगामी निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येण्यासाठी शहरी भागातील मतदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत.2004 साली भारतीय जनता पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात आलेले बाळासाहेब पाटील यांचा अपवाद वगळता 2019 पर्यंत सर्वच प्रमुख पक्षाकडून पनवेल विधानसभा निवडणुकीत स्थानिक आगरी समाजाचा उमेदवार उतरवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
यामुळे आतापर्यंत पनवेलमधून आगरी समाजाचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून आला आहे. आता मात्र परस्थिती बदलली असून, शहरी भागातील मतदार संख्या वाढल्याने राजकीय महत्वकांक्षा दिसून येत आहे. काही उमेदवारांकडून शहरीआणि ग्रामीण असा वाद पेटवून शहरी भागातील मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता हे नेमंक कोण करतं, कोणत्या पक्षातील उमेदवारांची ही रणनिती आहे हे अद्यापतरी अस्पष्ट आहे. मात्र यासगळ्याचा येणाऱ्या निवडणुकांवर काय परिणाम होईस हे पाहणं महत्त्वाचं आहे.
निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा
पनवेल आणि उरण तालुक्यातील गाव मिळून तयार झाली. या 188 पनवेल विधानसभा क्षेत्रात उरण तालुक्यातील गावं वगळून 2009 मध्ये उरण विधानसभेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पनवेल तालुक्यातील सिडकोने वसवलेल्या सिडको वसाहतीमधील मतदारांची संख्या पनवेल विधानसभा क्षेत्रात अधिक झाली. मात्र त्या नंतर झालेल्या कोणत्याही निवडणुकीत शहरी विरुद्ध ग्रामीण असा कोणताही वाद कधीच चर्चेला आला न्हवता. आता मात्र जाणूनबुजून हा वाद उकरून दोन्ही मतदारांमध्ये जाणीवपूर्वक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा वाद निर्माण करणाऱ्या उमेदवारां विरोधात मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.पनवेल विधानसभा क्षेत्रात शहरी तसेच ग्रामीण असा वाद कधीच निर्माण केला गेला न्हवता. ग्रामीण आणि शहरी मतदार नेहमीच गुण्या गोविंदाणे नांदत असताना समाज माध्यमानवर अशा प्रकारे प्रचार करून वाद निर्माण करणे घातक आहे. असं म्हटलं जात आहे.
निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा
विधानसभा निवडणुरकीला काही दिवस बाकी राहिले आहेत त्यामुळे राज्यभर सर्वच पक्षांची जोरदार प्रचारसभा सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकिय पक्षांमध्ये उमनेदवारी जाहीर न झाल्यामुळे अनेकजणांनी बंड पुकारुन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. तर काहींनी आंदोलनं मौर्चे काढून त्यांनी घरवापसी केली. दरम्यान विजयी होण्यासाठी प्रत्य़ेक पक्षाकडून काहीना काही रणनिती आखली जात आहे.