कुडाळमध्ये राज ठाकरेंचा वाढदिवस
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी उपक्रम राबवले होते. राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नेते शिरीष सावंत, सरचिटणीस संदीप दळवी, कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर म्हापसेकर तिठा पिंगुळी, कुडाळ गणपती मंदिर येथे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर तसेच तालुकाध्यक्ष हेमंत जाधव यांच्याकडून महाअभिषेक आणि भाविकांना प्रसाद वाटप सुद्धा करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या माध्यमातून ५०० वृक्ष वाटप यामध्ये एमआयडीसी असोसिएशन यांना २०० विविध प्रकारचे वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले. तर निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कुडाळ रेल्वे स्टेशन आणि कुडाळ मालवण रोड चौखुर्ण मंदिर येथे एसटी निवारा शेड लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जगन्नाथ गावडे, उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ, पिंगुळी विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, विभाग अध्यक्ष नेरुर शैलेश हडकर, शाखाध्यक्ष हुमरस संदेश रेडकर, माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, अक्षय जोशी, विद्यार्थी सेनेचे यतीन माजगावकर, अनिकेत ठाकूर आधी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.