कोकणात गणपतीला गावी जायचं म्हटलं तर तिकिट मिळता मिळत नाही. तिकिटांसाठी चाकरमान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच आता कोकण रेल्वे संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
कुडाळ-वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी-तेंडोली रस्ता पूर्णपणे खड्डेमय! प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच...१५ ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कुडाळ एसटी आगारात दाखल झालेल्या नवीन ५ एसटी बसांचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यानंतर आमदार राणे यांनी स्वतः एसटी बसमधून प्रवास करत त्याचा आनंद…
संकल्प क्रिएशन कुडाळ या संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज संगीत “वस्त्रहरण” नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत कुडाळ येथे झाला. त्यावेळी प्रणव रावराणे बोलत होते.
गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु आहे पण पाण्याचा मुख्य स्रोत नसल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
बसचे ब्रेक फेल झालेले नसून बसला एअर ब्रेक आहेत. एसटी आगार व्यवस्थापकांच्या भोंगळ कारभारामुळे कामगार सेना आक्रमक झाली आहे. माजी आमदार वैभव नाईक आणि कामगार सेनेने याबाबत व्यवस्थापकांना यांना जाब…
गेल्या १५ वर्षात सुमारे ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वाडीतील ग्रामस्थांनी केला असून प्रत्यक्षात ज्या कामावरती खर्च दाखवला ती कामं झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा सारा प्रकार कुडाळ मधील…
मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी-परंपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत.
पाट तिठ्यावर लक्ष्मण गोलतकर यांचे इस्त्रीचे दुकान होते. इस्त्रीसाठी आजूबाजूच्या परिसरातून आलेले कपडे त्यांनी आपल्या लाकडी कपाटात बंदिस्त ठेवले होते. ते जळून खाक झाले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले ज्यामुळे संपूर्ण महाराष्टभर निषेध नोंदवला जात आहे. कुडाळमध्ये सुद्धा निषेध नोंदवला गेला आहे.
झाराप येथे पर्यटकाला चहाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीविरोधात कुडाळात सकल हिंदू समाजाने पोलिसांना निवेदन दिले. पर्यटनाला बाधा पोहोचू नये यासाठी संबंधित स्टॉल बंद करण्याची मागणी करण्यात आली.
खरेदी-विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. त्यानंतर १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम…
गेल्या काही दिवसांपासून कुडाळ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गावातील काही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. ह्या पुरात 22 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या हळदीचे नेरूर येथील फुटब्रिज जवळील पूलाचा…
"कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय पडते यांच्याकडे सोपववत वैभव नाईक यांचा पत्ता कट केला आहे," अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.