Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आपल्यातून गेला, राज ठाकरेंनी विक्रम गोखलेंना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Tweet About Vikram Gokhale) यांनी ट्वीट करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांचा फोटो शेअर करत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Nov 26, 2022 | 06:09 PM
raj thackeray and vikram gokhale

raj thackeray and vikram gokhale

Follow Us
Follow Us:

रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज पुण्यात (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Tweet About Vikram Gokhale) यांनी ट्वीट करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांचा फोटो शेअर करत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ कलावंत विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.#विक्रमगोखले #VikramGokhale pic.twitter.com/Mcv0GmHhEW — Raj Thackeray (@RajThackeray) November 26, 2022

गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजूक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ट्विटरवर राज ठाकरे म्हणतात की, “मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळच. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते तिन्ही माध्यमात उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे त्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेक उत्तम होतीच, पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातूनदेखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रात उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे. ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन – राज ठाकरे”.

Web Title: Raj thackeray condelence message about vikram gokhale death nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2022 | 06:07 PM

Topics:  

  • raj thackeray
  • Vikram Gokhale

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
1

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका
2

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.