Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज मिरा-भाईंदरमध्ये होणार असून, अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या वादग्रस्त ठिकाणाच्या जवळच ही सभा होणार आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पेटलेल्या वादानंतर या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनसेकडून सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. “मिरा-भाईंदरमध्ये वाघ येतोय” अशा आशयाची पोस्टर्स शहरात झळकत असून, वातावरण तापलेले आहे.
या भागात काही दिवसांपूर्वी परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे मनसे विरुद्ध अमराठी व्यापारी असा संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांची सभा जोधपूर स्वीट्सपासून काही अंतरावर आयोजित करण्यात आली आहे – हाच तो ठिकाण जिथे वाद सुरू झाला होता. यामुळे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांना थेट मुंबईत येण्याचे आव्हान दिले आहे. दुबे यांच्या “पटक पटक के मारेंगे” या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदर येथे प्रचारसभेत उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले, “भाजपचा एक खासदार म्हणतो की, आम्ही येथे मराठी लोकांना मारू. तुम्ही मुंबईत या… आम्ही तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबो-डुब्बो के मारेंगे.” ठाकरे यांचे हे वक्तव्य दुबे यांनी त्यांच्या विधानाचे समर्थन केल्यानंतर समोर आले.
निशिकांत दुबे यांनी यापूर्वी म्हटले होते की, “मुंबई केवळ मराठी लोकांसाठी नाही”, तसेच त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. या भाषिक वादामुळे महाराष्ट्रातील हिंदी-मराठी तणाव पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट इशारा दिला की, महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये (पहिली ते पाचवी) हिंदी भाषा सक्तीची केल्यास मनसे त्या शाळा बंद पाडू असा इशाराही राज ठाकरेंनी . राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे. मी मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रातील लोकांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही.” त्यांनी उपस्थितांना आवाहन करताना सांगितले की, “शक्य तितक्या लवकर मराठी शिका आणि जिथे जाल तिथे मराठीत बोला.”
Ola-Uber Strike: ओला-उबेरविरोधी संपात फूट; महाराष्ट्र रिक्षा पंचायतसह अनेक संघटनांची माघार
याच पार्श्वभूमीवर, या महिन्याच्या सुरुवातीला मनसेसह शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि इतर काही राजकीय पक्ष व संघटनांच्या तीव्र विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीचे आदेश मागे घेतले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शालेय शिक्षणात भाषाविषयक निर्णयांभोवती पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.