हिंदी सक्तीचा आदेश ठाकरे सरकार काळातला?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपांवर ठाकरेंनी थेट पुरावाच दाखवला
Uddhav Thackeray News: “कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही, म्हणजे नाहीच,” असा ठाम इशारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करतोय, असा गैरसमज करून घेऊ नका, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्रिभाषा नियमावरून सुरू असलेल्या वादाला उत्तर दिलं. विरोधकांनी आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनीच त्रिभाषा धोरणावर सही केली होती.
यावर स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी कोणत्याही भाषेचा विरोध करत नाही, पण सक्ती मान्य नाही. त्रिभाषा धोरणाच्या कागदावर मी सही केली होती हे आरोप होत आहेत, पण मी आज तो मूळ कागद घेऊन आलो आहे. त्यावर २७ जानेवारी २०२२ ही तारीख आहे. आमचं सरकार तर जूनमध्ये पाडलं गेलं होतं. त्यामुळे हा मुद्दा माझ्यावर लादण्याचा प्रयत्न थांबवा.”या वक्तव्यानंतर त्रिभाषा धोरणावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये महाआघाडीत राजदचाच वरचष्मा? काँग्रेसला मिळणार फक्त इतक्या जागा, कसा आहे जागावाटपाचा
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसून येतो आहे. मी याला राजकारण नाही, माजकारण असे म्हणतो. आपण बॉक्सिंग पाहिली, मंत्र्यांना खोके उघडताना पाहिलं आणि काल तर थेट विधिमंडळाच्या आवारातच हाणामारी झाली. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशा ही घटना आहेत,” असे ते म्हणाले.
“सत्ता मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर सुरू आहे. आमच्याकडे ये नाहीतर तुरुंगात जा, अशा धमक्या दिल्या जातात. गुंडांना पक्षात घेतलं जातं, त्यांना गंगास्नान घालून पवित्र केलं जातं. आणि मग त्यांचा नवा ‘राजकीय जन्म’ घडवला जातो.” यावेळी त्यांनी राजकीय सौजन्य, लोकशाही मूल्ये आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकतेवरही प्रश्न उपस्थित केला. विधिमंडळातील घटनांवरून राज्यातील राजकारण तापले असून, ठाकरे यांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञानात करिअर घडवायचे आहे? पण Maths ची भीती वाटतेय? मग नक्की वाचा
‘आता सर्व पक्ष असे गुंड पक्षात घेत असतील, किंवा कळत नकळतपणे त्यांना निवडून आणले जात असतील तरी त्यांना वेळीच पदावरून दूर केलं पाहिजे. थेट विधानभवनाच्या आवारात असा राडा होत असेल तर देशात महाराष्ट्राची काय प्रतिमा तयार झाली असेल, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, यापूर्वी विधानभवनात असं कधीही घडलं नव्हतं. आज अनेक पक्ष थेट गुंडाना, पक्षात घेत आहेत. लोकशाहीचा खून करणारे लोक विधीमंडळाच्या आवारात वावरू लागले आहेत. तर जनतेचे काय करायचं असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.