Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरेंना निमंत्रण नाही? जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

  • By युवराज भगत
Updated On: Dec 28, 2023 | 03:28 PM
Raj Thackeray has not been invited to inaugurate the Ram temple, says Raj Thackeray

Raj Thackeray has not been invited to inaugurate the Ram temple, says Raj Thackeray

Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी  राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ही माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला माहिती दिली. राज ठाकरेंना राम मंदिराच्या उद्धाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला ब्रिजभूषण शरण सिंहांचा विरोध
राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. काल गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंना अद्याप निमंत्रण आलेले नाही. परंतु निमंत्रण लवकरच येण्याची शक्यता आहे. निमंत्रण आल्यानंतर राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का? हा देखील सवाल आहे.  कारण या पूर्वी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा आखला होता. मात्र  ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.
राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मण होऊ नये, म्हणून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा टाळला होता. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी राम मंदिराचे अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले होते. आता जर राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण आले तर राज ठाकरे उद्घाटन सोहळ्याला जातील, अशी माहिती राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिली.
राज ठाकरेंना निमंत्रण आल्यानंतर त्यांच्यासोबत कोण जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
काय म्हणाले होते गिरीश महाजन
गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदिरावरुन आमच्यावर टीका केली आहे, त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल.
निमंत्रणावरुन नाराजी नाट्य?
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्यात योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत.  ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार का नाही? अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Raj thackeray not invited to ayodhyas ram mandir dedication ceremony information from those close to raj thackeray nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2023 | 01:10 PM

Topics:  

  • raj thackeray
  • raj thackeray news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
2

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
3

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.