Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

Rohit Pawar Meet Raj Thackeray : आमदार रोहित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणि त्यातील गुन्ह्यांबाबत रोहित पवारांनी राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 02:38 PM
Rohit Pawar meet Raj Thackeray submitted the documents related to Ajit Pawar accident FIR

Rohit Pawar meet Raj Thackeray submitted the documents related to Ajit Pawar accident FIR

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
  • अजित पवारांच्या अपघातासंदर्भात केली चर्चा
  • राज ठाकरेंनी रोहित पवारांना दिले दोन दाखले
Rohit Pawar Meet Raj Thackeray : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती दुर्दैवी निधन झाले. त्यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. आमदार रोहित पवार यांनी यासाठी अनेकदा पत्रकार परिषद देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी बारामती आणि मुंबई पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. मात्र तिथेही फक्त एफआयआर दाखल करुन घेण्यात आला. यासंबंधित रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसे नेते राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली आहे.

आमदार रोहित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणि त्यातील गुन्ह्यांबाबत रोहित पवारांनी राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र अमित जी ठाकरे हेही उपस्थित होते. मला विश्वास आहे की, अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात राज ठाकरे साहेब हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : AI युगात भाषेला सक्षम अन् शक्तिशाली करण्यासाठी..! मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंचे मराठीजनांना खास आवाहन

त्याचबरोबर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “राज ठाकरेंची भेट घ्यायची आहे आणि वेळ हवा असल्याचे मी माझे मित्र अमित ठाकरे यांना सांगितले होते. त्यानंतर आज राज साहेबांची भेट घेतली, अजित दादांचा विमान अपघात याबद्दल बोललो. त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी माहिती मी घेऊन गेलो, ती सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर बोलत असताना ते म्हणाले की हा महत्वाचा विषय आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की पोलिसांनी दोन एफआयआर का नोंदवून घेतल्या नाहीत,” असे राज ठाकरे म्हणाले असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

मा. राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र… pic.twitter.com/9aOaLHGD1y — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026

हे देखील वाचा : BMC महापौर रितू तावडे यांचे कोट्यवधींचे घड्याळ चर्चेत? ट्रोलिंग होताच दिलं सडेतोड उत्तर

पुढे रोहित पवारांनी सांगितले की राज ठाकरे यांनी त्यांना दोन दाखले दिले आहेत. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा अभ्यास भरपूर असल्यामुळे त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. ज्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी एफआयआर घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे, असे सांगितले. तसेच दुसरा दाखला त्यांनी दिला, ते म्हणाले, काहीही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो, असंही त्यांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले. या महाराष्ट्रात एका मोठ्या व्यक्तीचा नेत्याचा जर एफआयआरचं होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे,” अशी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Rohit pawar meet raj thackeray submitted the documents related to ajit pawar accident fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • MLA Rohit Pawar
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय
1

Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय

बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच
2

बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच

Maharashtra Politics :  ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय
3

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.