मीरा-भाईंदर: आज मीरा भाईंदर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्याआधी मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे देखील उदघाटन पार पडले. राज ठाकरे यांनी आपल्या सभेत राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मीरा रोड येथील नित्यानंद नगरच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारावर भाष्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “आमचे तुमच्याशी काही वावडे नाही. भांडण देखील नाही. मात्र मस्ती करणार असाल तर, महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणारच. पहिली ते पाचवी हिंदी भाषा शिकली पाहिजे त्यावरून हे सर्व सुरु झाले. काल आमचे मुख्यमंत्री तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणारच, असे म्हणाले. मोर्च्याच्या धसक्याने राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तरी करा, दुकाने नाही, शाळादेखील बंद करेन.”
मराठीच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधून राज ठाकरे कडाडले
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहताय. शांतपणे रहा. मराठी शिका. आमचे तुमच्याशी काही भांडण नाहीये. तर इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणारच. हिंदी भाषा वाईट नाही पण लादणार असाल विरोध करणार. आम्ही हिंदू आहोत. हिंदी नाही. मीरारोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव आहे. मुंबई महानगर प्रदेसहतील मतदारसंघ अमराठी लोकांचा डाव आहे. मुंबई गुजरातमध्ये सामील करायची हि यांची स्वप्ने आहेत.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “अटकेपार झेंडे फडकवले.कटकच्या किल्ल्यावर झेंडा फडकवला. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय? न्याय द्या म्हणून आम्ही भिका मागायच्या? स्वतःहोऊन आपल्याला काही करायची गरज नाहीये. जर अशा प्रकारे माज घेऊन कोणी अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच.”
ठाकरे गट-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
“२० वर्षांनंतर एका व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू,” असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.