मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडीला ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्यानुसार, न्यायालयाने त्यांना समन्सही बजावले आहे.
हेदेखील वाचा : आरोग्य विभागाच्या क्लार्कला लाच घेणं भोवलं; ‘एसीबी’ने सापळा रचला अन् जाळ्यात अडकला
न्यायालयानेही विचारे यांच्या याचिकेची दखल घेऊन म्हस्के यांच्यासह २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स बजावून आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. म्हस्के यांचा ७ लाख ३४ हजार २३१ मते मिळाली होती, तर विचारे यांना ५ लाख १७ हजार २२० मते मिळाली. उर्वरित उमेदवारांना केवळ काही हजारांमध्ये मते मिळाली होती. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी, अशी मागणी विचारे यांनी याचिकेतून केली आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या ‘या’ पक्षाचे भाजपसोबत झाले मतभेद; दौऱ्यालाही केला विरोध
न्या. रियाज छागला यांच्या एकलपीठासमोर विचारे यांच्या याचिकेवर गुरुवारी प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने म्हस्के यांच्यासह अन्य २२ उमेदवारांना समन्स बजावले आणि याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्याचे आदेश दिले.
दोषी ठरवलेले नसल्याचा दावा
तत्पूर्वी, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना म्हस्के यांनी त्यांना कधीही दोषी ठरवलेले नसल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात, दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपीलही फेटाळल्याचा दावा विचारे यांच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी सुनावणीदरम्यान केला.