Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशिरसमधील तरुणांसाठी खुशखबर! लवकरच MIDC उभी राहणार; राम सातपुतेंची माहिती

माजी आमदार राम सातपुते हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.  ते आमदार असताना त्यांनी हे प्रश्न सभागृहात तत्कालीन मंत्री महोदयांकडे लावून धरले होते. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 24, 2025 | 07:32 PM
माळशिरसमधील तरुणांसाठी खुशखबर! लवकरच MIDC उभी राहणार; राम सातपुतेंची माहिती

माळशिरसमधील तरुणांसाठी खुशखबर! लवकरच MIDC उभी राहणार; राम सातपुतेंची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

माळशिरस : गेल्या अनेक वर्षापासून माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीचे स्वप्न अपूर्ण असून तालुक्यातील तरुणांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना रोजगारासाठी शहराच्या ठिकाणी जाऊ लागू नये यासाठी माळशिरस तालुक्यात लवकरच अद्यावत एमआयडीसी उभी राहणार असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होणार आहे तर निरा उजव्या कालव्यापासून वंचित असलेल्या तालुक्यातील 22 गावांना निरा देवघरचे पाणी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी पत्रकारांना दिली .

तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते पण या प्रयत्नांना आज अखेर मुर्त स्वरूप मिळत असून माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी दोन ते तीन ठिकाणच्या जागेची पाहणी झाली असून या जागेवर जर एमआयडीसी होत असल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होणार असून तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे याचबरोबर परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालालाही चांगला बाजारभाव मिळणार आहे तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे याचबरोबर गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या निरादेवघरच्या पाण्याचा प्रश्नही सुटला असून येत्या दोन वर्षात हे पाणी तालुक्यातील 22 गावांना मिळणार आहे अशी माहिती दिली

माजी आमदार राम सातपुते हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.  ते आमदार असताना त्यांनी हे प्रश्न सभागृहात तत्कालीन मंत्री महोदयांकडे लावून धरले होते.  पत्रव्यवहार केला होता.  त्यास सध्या मूर्त स्वरूप मिळाले असून लवकरच माळशिरस तालुक्यात अद्यावत एमआयडीसी व नीरा देवघर चे 22 गावांना पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांसह तरुणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे आमदार असताना राम सातपुते यांनी केलेल्या कामाची ही पोहचपावती असल्याचे बोलले जात आहे.

भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा- देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. या नवीन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या चार तालुक्यातील नागरिकांना आणि शेतीला याचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा: नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटींचा निधी; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले.  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून  याबाबतच्या मंजूरीचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या  झालेल्या बैठकीत गुंतवणूक मंजुरी समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. सिंचन, पूरनियंत्रण आणि बहुउद्देशीय प्रकल्पांवरील सल्लागार समितीच्या अटींच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात आली असल्याचेही जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केले आहे.

Web Title: Ram satpute said that a midc will soon be established in malshiras taluka and nira devghar dam water to 22 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • Malshiras

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.