Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव’; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 22, 2025 | 06:34 PM
'हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव'; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

'हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव'; डान्सबारवरून रामदास कदमांचं अनिल परबांना खुलं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी डान्सबारचा मुद्दा उपस्थित केला होता. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता.डान्सबारवर बंदी असताना यांना परवानगी कशी? असा सवाल करत त्यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर योगेश कदम यांचे वडील रामदास कदम, हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव असं आव्हान अनिल परब यांना दिलं आहे.

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका

अनिल परब यांच्या आरोपांवर उत्तर देताना, योगेश कदम यांनी राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात येत आहे. योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हटलं होतं. मात्र, अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. डान्सबार हा योगेश कदम यांच्याच मातोश्रींचा असल्याचा आरोप करत आयाबहिणींच्या नावावर बार सुरू करून बायका नाचवताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल केला होता.

रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार आहे. अनिल परब यांनी दादागिरीची भाषा करू नये, मी अशा दादागिरीला भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा. राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहीम हाती घेण्यासाठी मी योगेश कदम यांना सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर आरोप करावे लागतात. तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे आरोप करण्यात आले. सभागृहाने हे पटलावर ठेवायला नको, नियमबाह्य काम करुन हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे, अनिल परब यांच्यावर उद्या हक्क भंग आणणार आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने हक्कभंग टाकू शकलो नाही, अशी माहितीही त्यांनी एका वृत्तवाहिणीशी बोलताना दिली.

अनिल बरब यांनी सभागृहात जो सातबारा दाखवला तो बघायला त्यांच्या सगळ्या पिढ्या आणाव्यात. बाप दाखव नाहीतर श्रद्धा घाल. पोलिसांचे नियम पोलिसांना माहिती आहेत, त्यांनी योग्य कारवाई केली. मात्र आम्ही डान्सबार सुरू करून लोकांचे संसार उध्वस्त केले नाहीत. राजकीय मैदानात काही जमलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधिमंडळात करायला बघत आहेत. ठाकरेंनी कदम कुटुंबाला संपवण्याचा विडा उचलला आहे, पण ते कदापि शक्य होणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Manikrao Kokate Video: “दादांनी ‘माणिक’ नाहीतर ‘सागरगोटा’…”; शरद पवार गटाची रमी प्रकरणावरून कोकाटेंवर सडकून टीका

राजीनामा कसला मागता? पुरावा असतील तर मुख्यमंत्र्यांकडे द्या. आम्ही कोणाकडे मांडवली केली हे त्यानी सिद्ध करावं, आम्ही आमची प्रतिमा स्वच्छ ठेवली. जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुले कोणताही डाग लावून घेणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Ramdas kadam open challenge to anil parab on yogesh kadam resign demand over dance bar latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • Anil Parab
  • Dance Bar
  • Ramdas Kadam

संबंधित बातम्या

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार
1

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
2

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
3

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
4

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.