Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस पक्ष या चार जागांपैकी दोन ठिकाणी लढणार असल्याची माहिती नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 03, 2024 | 03:19 PM
कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश किर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Follow Us
Close
Follow Us:

कोकण : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदार संघ, नाशिक शिक्षक मतदार संघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील चार जागांकरिता जून महिन्याच्या 26 तारखेला निवडणुका होत आहेत. सोमवार दिनांक 3 जून रोजी काँग्रेस पक्षाचे रमेश कीर यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्ष या चार जागांपैकी दोन ठिकाणी लढणार असल्याची माहिती नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.

[read_also content=”पनवेलमध्ये बहिणीच्या प्रियकराची वडिलांसह मुलाने संगनमताने केली हत्या https://www.navarashtra.com/crime/son-kills-sister-boyfriend-in-connivance-with-father-in-panvel-542146.html”]

सोमवारी रमेश कीर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 10 जून रोजी केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. 31 मे पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जांची मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. 7 जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

बर्‍याच कालावधीनंतर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कोकण पदवीधर मतदार संघामध्ये निवडणूक लढली जाणार आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक वेळेला आघाडी धर्म पाळत असताना काँग्रेसचे चिन्ह नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी फारसे खुश नसायचे. परंतु आता मात्र काँग्रेस पक्षाच्या पारंपारिक निशाणीवरती ही निवडणूक होणार असल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title: Ramesh kir candidature has been filed by the congress party from konkan graduate constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • Congress Party

संबंधित बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर…; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी दिली प्रतिक्रीया
1

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर…; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी दिली प्रतिक्रीया

भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल म्हणत नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस 57 शहरांत घेणार पत्रकार परिषद
2

भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल म्हणत नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस 57 शहरांत घेणार पत्रकार परिषद

राहुल गांधी काँग्रेसमध्ये करणार अनेक महत्त्वपूर्ण बदल; अहमदाबाद अधिवेशनानंतर संघटना बदलाची येणार ब्ल्यूप्रिंट
3

राहुल गांधी काँग्रेसमध्ये करणार अनेक महत्त्वपूर्ण बदल; अहमदाबाद अधिवेशनानंतर संघटना बदलाची येणार ब्ल्यूप्रिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.