Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलातील रानमेवा होतोय दुर्मिळ, नवी पिढी राहणार चवीपासून वंचित, इतर फळांनी घेतली जागा

चारोळी, बिब्बा या रानमेव्याला शहरातील मॉलमध्ये सोन्यासारखा भाव आहे. मात्र, जो आदिवासी बांधव हा रानमेवा गोळा करतो, त्याचा कच्चा माल मातीमोल भावात घेतला जातो. बाजारपेठेची अनुपलब्धता, व्यवहाराची अनभिज्ञता यामुळेच हे शोषण होत आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाचे देणे असलेला रानमेवा दूर सारला जात आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 22, 2022 | 05:16 PM
Ranmeva in the forest is becoming rare new generation will be deprived of taste replaced by other fruits

Ranmeva in the forest is becoming rare new generation will be deprived of taste replaced by other fruits

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : शिशिर ऋतुच्या काळात पानगळ होऊन झाडांना मरगळ आल्याचा भास होतो. अशातच वसंत ऋतूचे आगमन होऊन झाडांना नवी पालवी फुटू लागते. हा ऋतुबदल चैत्र महिन्यात घडतो. याच कालावधीत जंगलात आंबा, टेंभर, चारोळी, कवठ, बोर आदी निसर्गाचा गोडवा असलेली फळे पूर्वी बाजारात विक्रीला यायची. परंतु, बदलत्या जीवनमानामुळे या जंगली फळांची जागा आता इतर देखण्या फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावी पिढीला त्याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भाग हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. येथील रानावनात बहुपयोगी विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतीसह रानातील मेवा असलेली विविध फळे आहेत. त्यात चारोळी, बोर, टेंबर, कवळ, आवळा, चिंचा इत्यादी जंगली फळे आहेत. ही फळे काही वर्षांपूर्वी बाजारात विक्रीला येत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा. त्यातून मोठी मिळकतही होत होती. परंतु, आज होणारी जंगलतोड, जंगली जनावरांचा वावर, सोबतच सुधारित जातीचे विदेशी आकर्षक फळे बाजारात उपलब्ध असल्याने या रानमेव्याकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी, आज बाजारात विविध देखणी फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या फळाकडे कुणी लक्ष देण्यास तयार नाही.

शहरात सोन्याचा भाव, कष्टकरी अनभिज्ञ
चारोळी, बिब्बा या रानमेव्याला शहरातील मॉलमध्ये सोन्यासारखा भाव आहे. मात्र, जो आदिवासी बांधव हा रानमेवा गोळा करतो, त्याचा कच्चा माल मातीमोल भावात घेतला जातो. बाजारपेठेची अनुपलब्धता, व्यवहाराची अनभिज्ञता यामुळेच हे शोषण होत आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाचे देणे असलेला रानमेवा दूर सारला जात आहे. हा लज्जतदार रानमेवा आता मिळणे कठीण झाले आहे. तर, भावी पिढीला त्याची चवच महिती  नसणार आहे. या रानमेव्यास पूर्वीचे भरभराटीचे दिवस येणे गरजेचे आहे.

Web Title: Ranmeva in the forest is becoming rare new generation will be deprived of taste replaced by other fruits nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना
1

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
2

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
4

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.