ईव्हीएम हॅक आरोपात तथ्य, मी स्वतः इंजिनीअर
परंडा : परंडा विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे. त्यादृष्टीने रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. रासपचे पदाधिकारी अनेक आंदोलन, निवेदने वेगवेगळ्या कामाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात, याचा फायदा नक्कीच रासपला होईल. म्हणून येणारी विधानसभा निवडणुक रासप स्वबळावर लढणार आहे, असे धाराशिव जिल्हाध्यक्ष व परांडा विधानसभा निरीक्षक ॲड. विकास पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कणकवलीत मविआचे आंदोलन; काळ्या फिती बांधत सरकार विरोधात घोषणाबाजी
आरोग्यमंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीच्या नात्याने राष्ट्रीय समाज पक्षाला कोणत्याही शासकीय समितीवर स्थान दिले नाही, कधी विचारात घेतले नाही, कोणताही निधी दिला नाही, यामुळे रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नाराज आहेत. अशातच सध्या महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ओबीसींच्या चर्चेतून सुद्धा दिसून येते की येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन निवडून आणू, अशी चर्चा सुरू झाल आहे.
याचा फटका मंत्री तानाजी सावंत यांना बसू शकतो. तसेच रासपच्या संपर्कात अनेक दिग्गज नेते मंडळी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे विकास पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : बदलापूर अत्याचार प्रकरणी मुंबई कोर्टात सुनावणी, सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश