Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामगार कल्याण मंडळाच्या गंभीर सहाय्यता योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक निधी, कसा भरायचा अर्ज ?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार किंवा कर्मचारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक लाभाच्या योजनेत करता मंडळाच्या कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 31, 2025 | 12:30 PM
कामगार कल्याण मंडळाच्या गंभीर सहाय्यता योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक निधी, कसा भरायचा अर्ज ?

कामगार कल्याण मंडळाच्या गंभीर सहाय्यता योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक निधी, कसा भरायचा अर्ज ?

Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण (संतोष सावर्डेकर):– महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात २६ हजार इतकी सर्वसाधारण सभासद नोंदणी झाली आहे. या मंडळाच्या शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, एमएससीआयटी, टंकलेखन व पाठ्यपुस्तक या योजनेअंतर्गत ३०० सभासदांनी अर्ज सादर केले होते. तसेच गंभीर आजार सहाय्यता योजनेअंतर्गत २५कामगार व १५ कामगार कुटुंबीयांना एकूण ८ लाख रुपये एनएफटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. एकंदरीत या मंडळाच्या योजनेचा कामगारांना हातभार मिळत आहे. याबाबतची माहिती गट प्रमुख कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी दिली आहे.

शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये कामगार कल्याण मंडळ योजनेअंतर्गत देखील कामगार, त्यांच्या कुटुंबीयांच्या, पाल्यांच्या शैक्षणिकतेमध्ये देखील मोठा हातभार लावला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार किंवा कर्मचारी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील दुकाने, कंपन्या, कारखाने, बँका, हॉटेल्स, टूर अँड ट्रॅव्हल्स, दुग्ध महासंघ, एस.टी. महामंडळ, वीज कंपन्या, पतसंस्था, जीवन प्राधिकरण, आयुर्विना महामंडळ, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, बेकरी उद्योग इत्यादी मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी २०२४-२५ व त्यापुढील आर्थिक वर्षाकरिता मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, गंभीर आजार, एमएससीआयटी आदी आर्थिक लाभाच्या योजनेत करता मंडळाच्या कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मंडळाकडून गेले अनेक वर्ष कामगार व कामगार पट्टीमेंसाठी ऑफलाईन पद्धतीने वरील सर्व योजना राबवण्यात येत होत्या. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून मंडळाने स्वतःचे WWW.public.mlwb.in हे पोर्टल सुरू केलेले आहे. तसेच महाकल्याण हे ॲप देखील विकसित करण्यात आलेले आहे. या मार्फत कामगार स्वतःसाठी व आपल्या पाल्यांसाठी मंडळाने जाहीर केलेल्या आर्थिक लाभाच्या योजना घरी बसून मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. मंडळाने प्रथम टप्प्यात स्थापना मालक यांना ऑनलाईन द्वारे मंडळाकडे नोंदणीकृत होण्यासाठी व दुसऱ्या टप्प्यात कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी मंडळाच्या सर्व सोयी सुविधा तसेच आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ त्यांना ऑनलाईन द्वारे मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कामकाज पूर्ण केले आहे.

चिपळूण गटांतर्गत रत्नागिरी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या जून/ डिसेंबर या महिन्यामध्ये २५ रुपये व मालकाचे ७५ रुपये प्रमाणे एका प्रत्येक कामगारास देण्यात आले. त्यावर आलेला लिन नंबर हा त्याचा युजर नेम म्हणून आणि सदर कामगारांनी आपल्या आस्थापनेकडे रजिस्टर करावा. मोबाईल नंबर हा त्यांचा पासवर्ड म्हणून मंडळाकडे असलेल्या सोयी सुविधांचा आर्थिक लाभाच्या योजना ऑनलाईन द्वारे पोर्टल द्वारे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन कामकाज करताना वापरायचा आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांनी मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत. यामध्ये अर्ज सादर करण्याची दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण मंडळ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Financial funds to be received under the labor welfare boards critical assistance scheme how to fill the application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Ratnagiri District

संबंधित बातम्या

Ratnagiri News : रत्नागिरीत फतेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला; गडावरील मानवीवस्तीला धोका
1

Ratnagiri News : रत्नागिरीत फतेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला; गडावरील मानवीवस्तीला धोका

Chiplun News :  कापसाळपर्यंत उड्डाणपुलासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा होणार? महायुती शिष्टमंडळाची महत्वाची बैठक
2

Chiplun News : कापसाळपर्यंत उड्डाणपुलासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा होणार? महायुती शिष्टमंडळाची महत्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.