Dr. Vinayak Kale appointed as new dean of Sassoon Hospital
पुणे : ससून रुग्णालयाजवळ पुणे पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्जप्रकरणात तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, या मागणीसाठी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी शासन ठाकूर यांना पाठीशी घालत असून, मी सातत्याने याचा पाठपुरावा करीत आहे आणि तो मी करणार, असे सांगितले.
कॅन्टीन बॉयसह दोघांना अटक
ससून रुग्णालयाच्या गेटवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज पकडून रुग्णालयाच्या कॅन्टीन बॉयसह दोघांना अटक केली. या प्रकरणात कैदी ललित पाटीलचा सहभाग उघड करून १४ जणांना बेड्या ठोकत मोक्का कारवाई केली. रुग्णालयातून सुरू असलेले रॅकेट उद्धवस्थ केले. गुन्ह्यात नुकतीच पोलिसांनी ससूनचा तो शिपाई व येरवडा कारागृहाच्या कर्मचाऱ्यासह कॉन्सीलरला अटक केली आहे.
ससून रुग्णालयाचे डीन व कर्मचारी यात सामील
दरम्यान, आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून ससून रुग्णालयाचे डीन व कर्मचारी यात सामील असून, त्यांनीच ललितचे लाड केले. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांच्याकडून पत्रकार परिषदेत वेळोवेळी केला जात होता. तसेच, आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात होती. त्यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीदेखील भेट घेतली होती. त्यांनी ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी ही मागणी -केली. काही वेळांनी त्यांनी आंदोलन मागे घेतले.