बदलापूर एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोट
बदलापूरमध्ये आज पहाटे एक भीषण घटना घडली आहे. बदलापूरच्या खरवई एमआयडीसी परिसरातील रेअर फार्मा कंपनीत पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान एक भीषण स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. बदलापूरकरांची श्रावण महिन्यातील पहिली सकाळ एका मोठ्या स्फोटाने झाली आहे. या घटनेत एमआयडीसी परिसरात राहणरे घनश्याम मेस्त्री यांच्या कुटुंबातील 3 जण जखमी झाले आहेत. तर या भीषण घटनेत घनश्याम मेस्त्री यांचा पाय निकामी झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील सर्वच जण गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरलं आहे.
हेदेखील वाचा- गटारी जीवावर बेतली! पार्टीसाठी गेलेले 5 जण नदीत बुडाले; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील रेअर फार्मा कंपनीत आज पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास रिऍक्टर आणि रिसिव्हरचा एक भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीत मोठी आग लागली होती. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील सर्व घरांना हादरे बसले. रिऍक्टर आणि रिसिव्हर फुटल्याने एमआयडीसी परिसरातील अनेक घरांवर रिऍक्टर आणि रिसिव्हरचे काही भाग पडले. सर्वच जण गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला त्यामुळे नागरिकांना स्वत:ला वाचवण्याची संधी मिळाली नाही.
हेदेखील वाचा- नाशिककरांना मोठा दिलासा! गंगापूर धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग सुरु
एमआयडीसी परिसरात राहणरे घनश्याम मेस्त्री यांच्या घरावर देखील रिऍक्टर आणि रिसिव्हरचे काही भाग पडले. या घटनेत घनश्याम मेस्त्री यांच्या कुटूंबातील 3 जण जखमी झाले आहेत, तर त्यांच्या घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भीषण घटनेत घनश्याम मेस्त्री यांचा पाय निकामी झाला आहे. तर त्यांच्या लहान मुलीच्या पायाला देखील दुखापत झाली आहे. जखमींना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरला होता. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील इतर घरांमध्ये देखील रिऍक्टरचे काही भाग पडले होते.
या भीषण घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 4 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज अत्यंत भीषण होता. या घटनेत घनश्याम मेस्त्री यांच्या घरावर रिऍक्टर आणि रिसिव्हरचे काही भाग पडले आणि त्यांच्या घरातील 3 जण जखमी झाले. हा स्फोट अत्यंत भीषण होता. या घटनेची माहिती मिळताच कुळगाव बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.