Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर देशभर आंदोलन पसरवण्याची तयारी; अखिल भारतीय मराठा महासंघाचा एल्गार

राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतर जाट, गुर्जर, पाटीदार समाजाकडूनही पुन्हा आरक्षणासाठी उडी घेण्यात आली आहे. संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची पत्रकार परिषद आज पार पडली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 06, 2024 | 06:47 PM
Pune Maratha Reservation

Pune Maratha Reservation

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे? भुजबळ यांना वाचवण्याचे काम अखिल भारतीय मराठा महासंघाने केले असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतर जाट, गुर्जर, पाटीदार समाजाकडूनही पुन्हा आरक्षणासाठी उडी घेण्यात आली आहे. जाट, मराठा, गुर्जर पाटीदार यांच्या संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी आरक्षणासंदर्भात राकेश टिकैत, दिलीप जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही आगपाखड का करता आहात?
दिलीप जगताप म्हणाले की, सर्व ओबीसी समाज त्यांच्या बाजूने नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पैसे देऊन केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, तर त्या मागण्या मंत्रिमंडळात विचारूनच घेतल्या असतील. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतरही तुम्ही आगपाखड का करता आहात? गुर्जर, जाट, पाटीदार आणि मराठा समाजाची कृती समिती बनवली आहे. आरक्षणाचा प्रश्न नाही सुटला तर भविष्यात कृती समिती यासंदर्भात निर्णय घेईल. शेतकरी आंदोलनातील हे चेहरे आहेत आणि आता त्यांच्याबरोबर मराठा समाज देखील आहे.

देशभर आंदोलन पसरवण्याची तयारी

आम्ही एकत्रितपणे यासंदर्भात लढणार आहोत. जरांगे यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशभर आंदोलन पसरवण्याची आम्ही तयारी केली आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. छगन भुजबळ हे भाजप किंवा फडणवीस यांनी सोडलेले पाळीव *त्रे आहेत, मंत्रिमंडळातले मराठेदेखील आता तोंड बंद करून आहेत, आमच्या दाढ्या सोडा आम्ही दुकानच उघडू देणार नाही भुजबळांना, असा इशारा देण्यात आला.

ग्रामीण भारत बंद करण्याचा आमचा विचार
भारतीय किसान मोर्चा प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, शेतकरी वर्गातील या सर्व जाती आहेत. जसं शेतकरी आंदोलन झालं तसं आंदोलन होतील. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एमएसपी गँरेंटी कायदा देशातील शेतकऱ्यांना मिळेल यासंदर्भात देखील आंदोलन होतील. ग्रामीण भारत बंद करण्याचा आमचा विचार आहे. 14 मार्चला आमचा एक कार्यक्रम आहे. शेतमालाला भाव मिळत नाही आहे

स्वामीनाथन कमिटीची रिपोर्ट लागू व्हायला पाहिजे, तोपर्यंत न्याय मिळणार नाही
भारतीय किसान मोर्चाचे युद्धवीरसिंग चौधरी म्हणाले की, देशातील कृषी प्रधान जाती आहेत, त्यांना एकत्र आणण्याचा आमचा विचार आहे. जातीय जनगणना 1931 मध्ये झाली होती, त्यामध्ये 80 टक्के लोकसंख्या एससी एसटी आणि ओबीसी आहेत. अशात, ज्यात ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याचा वाटा असं आम्हाला वाटतं. मागील अनेक वर्षांपासून यासंदर्भात आंदोलनं सुरु आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रित येत प्रश्न सोडवण्याचा आमचा विचार आहे. जोपर्यंत 80 टक्के आरक्षण नाही मिळत तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं वाटतं. चार समाज आज एकत्रित आले आहेत, त्यामुळे येत्या काळात आणखी लोकं आमच्या सोबत जुळतील, समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ready to spread agitation across the country if demands of jarange are not met elgar of all india maratha federation nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 06:47 PM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Minister Chhagan Bhujbal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.