सोलापूर : जिल्ह्यात ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता पंधरवाडा निमित्त महाआवास अभियान अंतर्गत २६४१ रमाई आवास घरकुलांना एकाचवेळी प्रशासकीय मंजुरी सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी दिल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच असा पायंडा पाडला आहे. जिल्हा परिषदेत आज जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांनी ऑनलाईन व्हिसीचे आयोजन केले होते. या बैठकीत सीईओ दिलीप स्वामी यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या २६४१ घरकुलांना केंद्र शासनाचे संकेतस्थळावर प्रशासकीय मान्यता दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, दक्षिण सोलापूर व मोहोळ चे गटविकास अधिकारी गणेश मोरे, उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी जस्मीन शेख, गटविकास अधिकारी एस. बी. खाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. एच. कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पंधरवाडा निमित्त महाआवास अभियान अंतर्गत रमाई घरकुलांना एकाचवेळी प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे गरीबांना वेळेत घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला.
मानवतेच्या भावनेतून सोलापूर जिल्हा परिषदेने उचलेले सकारात्मक पाऊल गरीबांना छत मिळण्यास मदत झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने मोहिम स्वरूपात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले. यामुळे गटविकास अधिकारी यांची जबाबदारी वाढली आहे. समता पंधरवाडा निमित्त रमाई घरकुल व शबरी घरकुलांना मंजुरी देऊन जिल्ह्यात चांगला पायंडा पाडला आहे. प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विशेष मोहिम राबविली होती. या मोहिमेचा हे यश आहे.
घरकुलाला नाविन्यतेची जोड द्या : दिलीप स्वामी
सोलापूर जिल्हा परिषदेने समता पंधरवाडानिमित्त मोठा निर्णय घेऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या घरकुलांना जिल्हास्तरीय समितीमध्ये मान्यता दिली आहे. गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यांत घरकुलामध्ये नाविन्यपूर्णता आणा. जे गटविकास अधिकारी घरकुलामध्ये नाविन्यता आणतील. त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. मंजुरीचा कालावधी, मंजुरीपासून बांधण्याचा कालावधी यामधील कालावधीचे अंतर कमी करा. गरीबांना वेळेत घरकुल बांधून मायेचे छत द्या, असे भावनिक आवाहन दिलीप स्वामी यांनी केले.
मोहिम स्वरूपात कामे पूर्ण करा : संतोष धोत्रे
जिल्ह्सात समता पंधरवाडानिमित्त २६४१ घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कामे सुरू करण्यास अडचण येणार नाही. गावपातळींवरून वेळेत कागदपत्रांची छाननी करण्यात आली. शासनाचे संकेतस्थळावर सर्व लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. जिल्हास्तरावर समितीमध्ये मान्यता घेण्यात आली.
शासनाचे संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेल्या रमाई घरकुलांची आज ऑनलाईनवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एका क्लिकवर एकाचवेळी रमाई घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद एकमेव आहे. दिलीप स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.