Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Alert: बारामतीत रेकॉर्डब्रेक पाऊस; इंदापूर तालुक्यातील १५० घरांमध्ये पाणी शिरलं

बारामती शहर व तालुक्यासहलगतच्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. बारामती शहरात एका दिवसात १८० मिलिमीटर तर आत्तापर्यंत ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2025 | 04:15 PM
Monsoon Alert: बारामतीत रेकॉर्डब्रेक पाऊस; इंदापूर तालुक्यातील १५० घरांमध्ये पाणी शिरलं
Follow Us
Follow Us:

बारामती:  बारामती तालुक्यासह इंदापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामती शहर तालुका व इंदापूर तालुक्यातील काही गावांमधील तब्बल १५० हून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तर पाण्यामध्ये अडकलेल्या काही नागरिकांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. बारामती शहरात एका दिवसात १८० तर आतापर्यंत ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बारामती शहर व तालुक्यासहलगतच्या इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. बारामती शहरात एका दिवसात १८० मिलिमीटर तर आत्तापर्यंत ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बारामतीची पावसाची सरासरी ४०० मिलिमीटर आहे, मात्र सरासरीच्या ९० टक्के पाऊस बारामती शहरात मेमध्येच झाला. बारामती शहरातील ७० घरांमध्ये पाणी शिरले असून यामध्ये २५ घरांची पडझड झाली आहे. बारामती शहरातील जवळची या ठिकाणी ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी वर निघालेला रिपेश सिंग हा व्यक्ती पाण्यामध्ये वाहून गेला, मात्र सुदैवाने त्याने ओढ्याच्या पात्रातील कडेला असलेल्या एका झाडाला पकडून ठेवले, बारामती नगरपालिका अग्निशमन दल व बारामती एमआयडीसी अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Mansoon Update : पावसाचा कहर, उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला

बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरले होते, त्यामुळे पाण्याने वेढा दिल्याने अडकलेल्या नवनाथ देवकाते, पांडुरंग देवकाते, परशुराम देवकाते, अमोल देवकाते, अशा देवकाते, बापू नरूटे, किशोर देवकाते या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढेकळवाडी या ठिकाणी देखील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्या ठिकाणच्या नागरिकांची सोय मंदिर व शाळेमध्ये करण्यात आली.

इंदापूर तालुक्यातील सणसर याठिकाणी देखील आणि त्यांच्या घरामध्ये पाणी गेले. निरगुडे येथील ४० घरांमध्ये, शेटफळगढे येथे १५, लाकडी येथे दोन घरामध्ये, चिखली येथे १४ , कुरवली तसेच तावशी या ठिकाणी देखील काही घरांमध्ये पाणी शिरले. इंदापूर तालुक्यातील जांब या ठिकाणी नीरा नदीच्या बंधाऱ्यावर काम करत असलेले दोन कामगार पोकलेन मशीन सह पुरामध्ये अडकले, त्यांना प्रशासन व पोलिसांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान बाहेरून आलेल्या नागरिकांना बंद वाहतुकीमुळे अडकून बसण्याची वेळ आली.

Web Title: Record breaking rain in baramati water entered 150 houses in indapur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!
1

Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
2

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.