Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता

ग्रामपंचायतीकडून गाळ काढण्याची मागणी, त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून मंजुरी आणि १५ अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरपंच 'आम्ही असे कोणतेही पत्र दिले नाही' असे सांगत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2026 | 11:11 AM
कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता

कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता

Follow Us
Close
Follow Us:

यवत : कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्याबाबत लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद पुणे यांनी स्पष्ट नियम, अटी व शर्ती घालून लेखी परवानगी दिली. असे असतानाही त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पत्र तलाठी, मंडल अधिकारी व ग्रामपंचायत भरतगाव यांना देण्यात आले असतानाही स्थानिक पातळीवर त्याबाबत अनभिज्ञता असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीकडून गाळ काढण्याची मागणी, त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून मंजुरी आणि १५ अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सरपंच ‘आम्ही असे कोणतेही पत्र दिले नाही’ असे सांगत आहेत. तर तलाठी ‘गाळ कोण काढत आहे याची माहिती नाही’ असे म्हणत आहेत. महसूल मंडल अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.

PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर

नियम क्रमांक ९ नुसार गाळाचा हिशेब, वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंद व शेतकऱ्यांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे. नियम १२ नुसार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम होणे अपेक्षित आहे. तसेच नियम १३ नुसार गौण खनिजासंदर्भातील जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली आहे. तरीही या सर्व नियमांना फाटा देत गेल्या १५ दिवसांपासून तलावात रात्रंदिवस गाळ उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रोज हजारो रुपयांचा गाळ काढला जात असताना स्थानिक प्रशासन अनभिज्ञ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे हा प्रकार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता पुन्हा तोच प्रकार सुरू

काही वर्षांपूर्वी याच तलावातील गाळ व वाळू उपसातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले होते. मात्र, कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही. आता पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याची चर्चा रंगत आहे.

Web Title: Regulations being completely disregarded in the desilting of the kasurdi bharatgaon lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.