PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
हे देखील वाचा : अखेर ठरलं! पिंपरीतील डेअरी फार्म पूल कधी खुला होणार? महत्त्वाची माहिती समोर
सध्या लोणावळा,भुलेश्वर,पानशेत,वरसगाव, मोराची चिंचोली यांसारख्या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत आहेत. गुरुवार, शनिवार आणि रविवारी आठवड्यातून तीन दिवस वातानुकूलित ई-बस चालवण्यात येतात. तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा ३३ प्रवाशांचे गट बुकिंग झाल्यास इतर दिवशीही बसची सोय केली जाते. या बससेवेचे तिकीट दर ५०० रुपये आहे.पीएमपी प्रशासनाने सध्या १२ पर्यटन मार्गांवर बससेवा सुरू केली असून, या सेवेमुळे पर्यटकांना सोयीस्कर आणि किफायतशीर पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
तिकीट बुकिंग केंद्रे
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक आणि निगडी बसस्थानक येथे तिकीट उपलब्ध आहेत.
उत्पन्नाचा आढावा :
वर्ष उत्पन्न
२०२३ ५ लाख रुपये
२०२४ ५ लाख ५ हजार रुपये
२०२५-२६ (मार्चपर्यंत) ६८ लाख रुपये
पीएमपीतचे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विविध भागांतील पर्यटकांना पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.या सेवेला ज्येष्ठ आणि तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल-मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी देखील पर्यटन बससेवेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, नवीन पर्यटन मार्ग सुरू करण्याची मागणीही वाढत असल्याचे म्हटले.
तर प्रशांत कुलकर्णी ज्येष्ठ प्रवाशाने वरसगाव, पानशेत, शिरकाई देवी दर्शन आणि पक्षी संग्रहालयाचा प्रवास अतिशय आनंददायी ठरला. पानशेत येथे बोटिंग, जंगल सफारी आणि पक्षांना खाद्य देण्याचा अनुभव विशेष होता. संपूर्ण ट्रिप उत्कृष्ट नियोजनामुळे संस्मरणीय ठरली असल्याचे सांगितले.






