Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला अटक, धमकी देत ५ कोटींच्या खंडणीची मागणी

मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) इंदौर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत धनंजय मुंडेंना धमकावणाऱ्या रेणू शर्माला (Renu Sharma Arrest) अटक केली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 21, 2022 | 03:02 PM
renu sharma and dhananjay munde

renu sharma and dhananjay munde

Follow Us
Follow Us:

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महिलेविरुद्ध पोलिसांत खंडणीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) इंदोर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत तिला अटक केली आहे. (Blackmailing Case) तसेच, ही महिला परिचयाचीच असून महिलेनं ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

[read_also content=”मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स, ईडी करणार चार्जशीट दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/ed-summons-to-nawab-maliks-sons-for-inquiry-nrsr-271566.html”]

‘मागील वर्षी सहजच एक कागद पोलिसांत दिला तर तुमचं मंत्री पद धोक्यात आलं होतं, आता पुन्हा तिच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचं मंत्रीपद घालवीन, असं होऊ द्यायचं नसेल तर मला ५ कोटी रक्कम आणि ५ कोटींचे दुकान घेऊन द्या’, असं ब्लॅकमेल करत अशा प्रकारची खंडणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कथित रेणू शर्मा नामक महिलेनं केली आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये धाव घेत सदर महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेल करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली आहे.

रेणू शर्मा या महिलेनं मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिनं ही तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांत दिले असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदोर कोर्टात हजर केलं, इंदोर कोर्टानं तिचा ताबा दिला आणि त्यानंतर आज सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दरम्यान,  रेणू शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातील तक्रारी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

Web Title: Renu sharma arrested in blackmailing case of dhananjay munde nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2022 | 02:59 PM

Topics:  

  • Blackmailing Case
  • dhananjay munde

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका
2

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’
3

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.