आता रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार? जाणून घ्या नेमका निर्णय काय?
अमरावती : उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. मात्र, ऐनवेळी प्रवासाला निघाले, तर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच तिकिटे आरक्षित केली जातात. मात्र, रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणेही कठीण जाते. तेव्हा आतापासूनच तिकिटांचे आरक्षण केले, तर प्रवासाचे निम्मे टेन्शन दूर होईल, अशा मानसिकतेत प्रवासी आहेत. मुलांच्या द्वितीयसत्र परीक्षा संपल्या की कुठे तरी तरी फिरायला जाण्याचे नियोजन केले जाते. त्यात अनेकजण देवदर्शनाचा बेत आखतात, तर काही जण मुंबई, पुणे या ठिकाणी जातात. उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशातही जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपतात. त्यानंतर मे महिन्यात बहुतांश जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. फिरायला जाताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होणे गरजेचे असते.
ऐनवेळी तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ते मिळत नाहीत. मग फिरायला जाताना सर्वात पर्यायी व्यवस्था शोधावी लागते आणि धावपळ होते. त्यामुळे उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर आतापासूनच रेल्वेचे आरक्षण बुक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रवाशांना नियोजन करावे लागेल. त्यामुळे आतापासून रेल्वेचे बुकिंग करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नवी दिल्ली, तिरुपती बालाजी रेल्वे प्रवास करण्यासाठी नागरिकांची संख्या अधिक आहे.
उन्हाळ्यात वाढते रेल्वे प्रवाशांची संख्या
उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते. अशावेळी आरक्षित तिकीट मिळणे कठीण जाते. आधीपासूनच आरक्षित तिकिटाचे बुकिंग करून ठेवले, तर रेल्वे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो. त्यामुळे आतापासून रेल्वे आरक्षण बुकिंग करणे महत्त्वाचे आहे.