मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
मोठी बातमी समोर येत असून आता राज्यातील रिक्षाचालक, टॅक्सिचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि मोठीं घोषणा केली असून यासह कोणत्याही टॅक्सिचालक आणि रिक्षाचालकांवर पुढील एका वर्षापर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार, 27 ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत हि मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईतील रिक्षाचालक, टॅक्सिचालक युनियनने भेट घेतली असून त्यांनी मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अमराठी चालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय फडणवीसांनी ओव्हररुल केला असल्यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चा रंगल्या आहेत.






