

जनतेच्या प्रश्नांसाठी रोहित वाडकर मैदानात
चिखलीत दहा लाखांच्या कामांचा श्रीगणेशा
रोहित वाडकरांच्या पाठपुराव्याला यश
वाई : जनतेचे प्रश्न केवळ मांडायचे नाहीत, तर ते सोडविण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा,ही आपल्या कामाची पद्धत आहे. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच आपल्या प्रयत्नांचे खरे फलित असल्याचे मत युवानेते रोहित वाडकर यांनी व्यक्त केले. चिखली ता वाई येथील आंबेडकर नगरमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला संरक्षण भिंत आणि पाइपलाइनच्या दहा लाख रुपये खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते
यावेळी सरपंच वैशाली मांढरे, उपसरपंच मारुती वाडकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय वाडकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ यादव, मेघा सपकाळ, चिखली विकास सेवा सोसायटीचे संचालक नामदेव मांढरे, माजी चेअरमन संजय वाडकर, पोलीस पाटील छाया सोनावले, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.वाडकर पुढे म्हणाले की,ना.जयकुमार गोरे तसेच आ.धैर्यशील कदम यांनी सहकार्य केल्यानेच या दोन्ही कामासाठी निधी उपलब्ध झाला.यापुढेही यशवंतनगर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.
चिखलीच्या आंबेडकर नगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत रोहित वाडकर यांनी जुन्या विहिरीपासून आवश्यक पाइपलाइनचे काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. मात्र, संबंधित विहीर ओढ्यालगत असल्याने ओढ्यातील दूषित पाणी विहिरीत मिसळण्याची शक्यता होती. त्यामुळे विहिरीला ओढ्याच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
या मागणीची दखल घेत वाडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यापासून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तसेच निविदा प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, दहा लाख रुपये खर्चाच्या संरक्षण भिंत व पाइपलाइन कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी राजेंद्र मांढरे, राजेंद्र सोंडकर, सुरेश मांढरे, सुभाष वाडकर, नारायण आमले, अर्जुन कासुर्डे, साहेबराव बडे, चंद्रकांत सोनवणे, बाबा सोनवले, दिनेश सोनवले, निलेश सोनवले यांच्यासह आंबेडकर नगरमधील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.