संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) असं तंत्रज्ञान विकसिकत केलं असून समुद्राचं पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.
पंजाब आणि हरियाणामधील पाणीवाटपाचा वाद इतका तीव्र झाला आहे की पंजाब विधानसभेत असा ठराव मंजूर करण्यात आला आहे की पंजाबकडे जास्त पाणी नसल्याने हरियाणाला एक थेंबही पाणी दिले जाणार नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला…
अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 119 गावांमध्ये जलसंकट असले तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. जलप्रकल्पातील साठाही 14 टक्क्यांपर्यंत आला आहे. 245 गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.
राज्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची पातळी देखील झपाट्याने खालावत चालली असून याचा फटका नागरिकांना बसत आहे.
घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्याचा पीडित कुटुंबांचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे.
शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण अति पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दाब येऊन मूत्रपिंडासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर…
रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यातच आता म्हसळा तालुक्यातील तोंडसुर गावातील हजारो महिलांनी 3 किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा केला आहे.
महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टँकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे. महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी…
गेल्या महिन्यात शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील किरकटवाडी, नांदाेशी, नांदेड आदी भागात माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजारांचे रूग्ण आढळून आले होते. सदर आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापािलकेला दरवर्षी जलसंपदा विभागाकडून थकबाकी संदर्भात नाेटीस पाठविली जाते. पाणी कपातीचा इशारा दिल्यानंतर महापािलकेकडून काही रक्कम भरली जाते. वास्तविक पाणी पट्टी आकारणीसंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद आहेत.
देशातील पहिला ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट लवकरच सुरु होणार आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील ताप्ती नदीपात्रात जगातील सर्वात मोठा ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशातील लोकांचे…
नळ जोडणीसह मीटर बसवण्याचा व वीज जोडणीचा प्रश्न अध्याप तसाच आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने अपूर्ण कामाबद्दल वारंवार तक्रारी झाल्या. त्याकडे दुर्लक्ष झाले.
१ जानेवारी२०२५ पासून आजपर्यंत तर १०टक्के क्षमतेने शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे जलसंपदा खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे, असे वेलणकर यांनी…