कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत…
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन अग्रेसर दिसत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे शहरी भागांमध्ये पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
जर तुम्ही ठाणे शहरात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी ७० टक्क्यांहून अधिक आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्याने कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात येणार आहे.
मिरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.
मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला…
कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्या बाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
ठाण्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांना सुमारे ४८ खासगी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणे भरण्यासही वेळ लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धरण साठ्यात फक्त 10 टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे तिथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या खूप गंभीर झाली आहे. सर्व प्रकारचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वत्र पाण्याचा (Water Shortage) ठणठणाट आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने जनावरांचा चारा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्ह्यात चारा बंदी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण…
गट ग्रामपंचायत जांभूळखेडा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजना कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने निकामी होत मागील 15 दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८००…
कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठयाची सर्व मदार शीळ जॅकवेलवरच अवलंबून असते. तर शीळ जॅकवेलमधून होणार पाणीपुरवठा अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विस्कळीत होताना दिसतो.