Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या विकास कामांचा होणार भांडाफोड, बोगस काम करणाऱ्यांचं पितळ ‘या’ गोष्टीमुळे पडणार उघडं

अलिबाग (Alibag) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत (Sanjay Sawant) यांना जिल्हयातील ठेकेदार यांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या शेकडो कोटींच्या बिलांबाबत नाकारलेली माहिती मोफत पुरविण्याचे आदेश दिले आहेत. सावंत यांना त्या आदेशाप्रमाणे सर्व माहिती आज मोफत देण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Jan 18, 2023 | 07:37 PM
rajgad zp news

rajgad zp news

Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेने (Raigad) जिल्ह्यातील ठेकेदारांना ऑनलाईन पध्दतीने शेकडाे काेटी रुपयांची बिले अदा केली हाेती. याबाबतची माहिती अधिकारात मागितलेली माहिती प्रथम अपीलीय अधिकारी यांनी देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता शेकडाे काेटी रुपयांचा निधी खर्च करुन देखील कामे झाली नसतील तर ते आता उघड हाेणार आहे. संजय सावंत(Sanjay Sawant) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बाेगस कामांचा भांडाफाेड हाेणार असल्याचे बाेलले जाते. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

[read_also content=”मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंटची आलिया भट्टला टक्कर, ‘या’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/radhika-merchant-dance-on-ghar-more-pardesiya-song-at-mehndi-ceremony-nrsr-362741.html”]

सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी याबाबतची माहिती मागितली हाेती, मात्र संबंधित माहिती अधिकारी यांनी माहिती वैयक्तिक असल्याचे कारण पुढे करत देण्याचे टाळले हाेते. त्यानंतर सावंत यांनी अपिल दाखल केले. रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाचे अपीलीय अधिकारी तथा कॅफो यांनी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांना जिल्हयातील ठेकेदार यांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या शेकडो कोटींच्या बिलांबाबत नाकारलेली माहिती मोफत पुरविण्याचे आदेश दिले आहेत. सावंत यांना त्या आदेशाप्रमाणे सर्व माहिती आज मोफत देण्यात आली आहे. त्याबद्दल सावंत यांनी अपीलीय अधिकारी भगवान घाडगे यांचे आभार मानले आहेत.

ठेकेदारांना वाटलेल्या कोटींच्या कोटींची खिरापत जगजाहीर होवून अधिकारी अडचणीत येणार असल्याने आपल्याला माहिती नाकारल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. सावंत यांना माहिती नाकारताना जन माहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 8(1) मधील (घ), (ड) व (त्र) नुसार वैयक्तीक तपशिलाची माहिती उदाहरण ठेकेदाराचे खात्याचे वर्णन, बँकेचा तपशील, खाते क्रमांक, आयएएसी कोड आदी वैयक्तीक माहिती असल्याचे कारण दिले होते. सावंत यांनी याबाबत दाखल केलेल्या प्रथम अपीलाची सुनावणी जानेवारी 2023 रोजी झाली.

नागरिकांचा मुलभूत अधिकार
ठेकेदाराला रायगड जिल्हा परिषदेकडून शासकीय निधीमधून बिले अदा केली असल्याने त्याची माहिती मिळणे हा नागरिक म्हणून अर्जदार यांचा मुलभूत अधिकार आहे. अर्जदार यांनी ठेकेदाराची कोणतीही वैयक्तीक माहिती मागितलेली नाही. ठेकेदाराच्या बँक खाते, बँकेचे नाव वैगरे कॉलम वगळून फक्त ठेकेदाराला दिलेल्या शासकीय रक्कमेची व कोणत्या कामासाठी रक्कम दिली आहे याची प्रिंट आउट माहिती अर्जदाराला देणे जनमाहिती अधिकारी यांना शक्य होते. परंतु त्यांनी जाणीव पूर्वक माहिती नाकारली आहे. रायगड जिल्हयात अनेक ठिकाणी ठेकेदारांनी शासकीय बीले काढून प्रत्यक्षात कामे केली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ठेकेदारांना दिलेल्या ऑनलाईन प्रिंटआउट मागितल्या होत्या. ऑनलाईन प्रिंटआउट मिळाल्यामुळे जन माहिती अधिकारी यांना कोणतीही माहिती लपविता येणार नसल्याने ऑनलाईन तपशीलाची प्रिंट मागितली होती. सावंत यांचे म्हणणे ग्राहय धरून रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाचे अपीलीय अधिकारी तथा कॅफो यांनी सावंत यांना जिल्हयातील ठेकेदार यांना ऑनलाईन पध्दतीने दिलेल्या शेकडो कोटींच्या बीलांबाबत नाकारलेली माहिती मोफत पुरविण्याचे आदेश केले. त्यामुळे आता काेणत्या ठेकेदाराच्या खात्यात किती रक्कम गेली आहे. हे लवकरच बाहेर येणार आहे. तसेच एखाद्या विभागात काम झाल्याचे कागदावर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र कामे झाले नसल्याचे उघड हाेणार आहे.

संजय सावंत यांचे आवाहन
कुणाला कामांची माहिती पाहीजे असल्यास ती जनतेला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आपल्या विभागातील विकास कामांबाबत संशय असल्यास त्यांनी संपर्क साधून माहिती घ्यावी आणि खरंच विकास झाला आहे का याची शहानिशा करावी, असे आवाहन संजय सावंत यांनी केले आहे.

Web Title: Rti activist sanjay sawant revealed bogus work done by raigad zp nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 07:35 PM

Topics:  

  • Alibag

संबंधित बातम्या

अलिबाग समुद्रकिनारी शंभर एकरवर भराव, सतीश धारपांचा बांधकाम कंपन्यांना इशारा
1

अलिबाग समुद्रकिनारी शंभर एकरवर भराव, सतीश धारपांचा बांधकाम कंपन्यांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.