
मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिला अत्याचाराविरोधात देशात कठोर कायदे करण्याचीही मागणी होत आहेत. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन महिला अत्याचारांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. असे असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील महिला अत्याच्याराच्या घटनांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य महिला आयोग बरखास्त करावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांनी थेट शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. तुतारीचे पदाधिकारी महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घ्यावी, असा आरोप चाकणकरांनी केला आहे.
“गेल्या तीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत आहे. राज्यात कुठेही महिला अत्याचाराचे प्रकार घडल्यानंतरच राज्य महिला आयोगाची आठवण येते. कारण राज्य महिला आयोगच न्याय मिळवून देईल असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझ्या कामाचं यश आहे.” असंही त्यांनी नमुद केलं. महाराष्ट्रात महालिकांवर अत्याचार घडल्यास त्याची सर्वात आधी दखल महिला आयोगाकडून घेतली जाते. पण जर पोलीस काही प्रकरणांमध्ये कारवाई करत असतील तर त्यात आयोग ढवळाढवळ करत नाही. त्याशिवाय जर एखाद्या प्रकणात महिलेला न्याय मिळण्यास उशीर झाल्यास आयोगाकडून तातडीने दखल घेतली जाते. पण तरीही विरोधकांकडून टीका होत राहते.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना घरी बसण्याचा संदेश दिल्यामुळे त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम राहीलं नाही. महाराष्ट्रातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनप विद्या चव्हाण बोलत आहेत. पण हे किती हास्यास्पद आहे. त्यांनी त्यांच्या सुनेचा किती छळ केलाय हे सगळ्यांना माहिती आहे. शरद पवारांच्या पक्षात महिला प्रदेशाध्यक्षपद भूषवलेली महिला जर सुनेचा छळ करत असतील तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. असं म्हणत त्यांनी विद्या चव्हाणांना टोला लगावला. कुरारमध्ये पीडित महिला आणि त्यांच्या दोन मुलींचा विनयभंग करणारा वार्ड अध्यक्ष हा तुतारी गटाचा आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या ज्या घटना होत असताना या घटनांमध्ये तुतारीचे पदाधिकारी आघाडीवर आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Republic Day 2025: कोण होते प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख अतिथी? कधीपासून सुरू
चाकणकर यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत असे म्हटले की, खासदार सुप्रिया सुळे यांनी जर या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन समाजात कशा प्रकारे वागावे याचे मार्गदर्शन केले, तर निम्म्या महाराष्ट्राला सुरक्षितता मिळू शकेल. त्याचवेळी, त्यांनी पूर्वी घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला ज्या मध्ये नगर येथील मुरकुटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराबाबत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवत असून, या प्रकरणात आतापर्यंत सोशल मीडियावर चार गुन्हे दाखल झाले आहेत. चाकणकर यांचे म्हणणे आहे की, तुतारी गटाचे पदाधिकारी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या गटात आघाडीवर आहेत.