
Sambhaji Raje Chhatrapati's first reaction on Maratha reservation
Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation Bill : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. त्यानंतर हे विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले. विधान परिषदेतही हे विधेयक एकमताने मंजूर झाले. या विधेयकानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि राज्य सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया देत राज्य सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
स्वतः दिलेल्या लढ्याची दिली आठवण
यामध्ये त्यांनी स्वतः मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्याकरिता 2 वर्षे लढा दिला होता. आता हाच धागा पकडत राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक केले आहे.
संभाजीराजेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले वाचा……
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.
मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण
शासनाने ही मागणी मान्य करीत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.