Santosh Deshmukh Case: "...की फडणवीस, पवार निर्णयच घेत नाहीत?"; बीड प्रकरणात संभाजीराजे छत्रपती कडाडले
बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी आणि सीआयडीकडून केला जात आहे. प्रमुख आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास होत नाही तोवर मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र मी राजीनामा दिलेला नाही, असे मुंडे म्हणाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंडे राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र मी राजीनामा दिलेला नाही असे आज मुंडे म्हणाले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर टीका केली आहे. संतोष देशमुखी यांच्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते हे दुर्दैव आहे. जोवर संतोष देशमुख यांना नये मिळत नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार आहे , असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतके नेमके काय आहे की, मुख्यमंत्री आणि ऊपमूकहयमाणतरी त्यांच्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेत नाहीत? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापूर्ती होती का? सरकार या हत्या प्रकरणात दुर्लक्ष करत आहे का? असे काही महत्वाचे प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: Dhananjay Munde News: राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh: अंजली दमानियांनी घेतली फडणवीसांची भेट; केल्या ‘या’ मागण्या, कोणाच्या अडचणी वाढणार?
सुरेश धस यांचे आरोप
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतरही भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत काही गंभीर आरोप केले. सुरेश धस म्हणाले, “त्यानंतर 19 जून रोजी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर अवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कराडने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावर वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यावर निवडणुकीसाठी कंपनीकडे लगेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने त्यांना 50 लाख रू