अंजली दमानिया यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (फोटो -टीम नवराष्ट्र)
मुंबई: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे. तर विरोधी पक्ष मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी देखील हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. दरम्यान, आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
राज्य सरकारवर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात येत असलेल्या धमक्यांची माहिती दिली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल देखील त्यांनी चर्चा केली. या भेटीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. या महत्वाच्या मागण्या कोणत्या आहेत ते पाहुयात. अंजली दमानिया यांनी केलेल्या मागण्यांमुळे कोणाच्या अडचणी वाढणार हे पहावे लागणार आहे.
Meeting CM Fadnavis at 7pm today at Sahyadri.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 6, 2025
अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्या
वाल्मीक कराड असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत.
एसआयटी रद्द करून बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी हॉटलाइन तयार करावी.
बीडमधून अनेक तक्रारी येत आहे. त्याची नोंद करून घ्यावी.
बीडमधील विना नंबर प्लेटच्या गाड्या ताब्यात घ्याव्यात.
वाल्मीक कराडच्या नावाबर अनेक बार आहेत, जे कायद्याचे पालन न करता देण्यात आले आहेत. त्याची चौकशी करावी.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
बीड पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. महाजन यांची नियुक्ती आता नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
अंजली दमानिया यांचे काय आहे ट्वीट?
मुख्यमंत्री ताबतोब ही SIT बरखास्त करा. बीड पोलिस ही चौकशी करणे अयोग्य खूपशा पोलिस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध. जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांना ON Camera चौकशी चे आदेश तात्काळ द्या.
मुख्यमंत्री ताबतोब ही SIT बरखास्त करा
बीड पोलिस ही चौकशी करणे अयोग्य
खूपशा पोलिस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध
जिल्ह्या बाहेरच्या अधिकाऱ्यांना ON Camera चौकशी चे आदेश तात्काळ द्या pic.twitter.com/UKgkvE9alU
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2025
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
दरम्यान, वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी कमिटीतील एक अधिकारी महेश विघ्ने हे वाल्मिक कराडचे मित्र असल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे.महेश विघ्ने नावाच्या व्यक्तीचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो दाखवत, बजरंग सोनावणे यांनी हा आरोप केला. “मित्रच वाल्मिक कराड याची चौकशी कशी करेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला, बजरंग सोनावणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवशीचा वाल्मिक कराडचा एक फोटो जयंतराव पाटील यांनी ट्वीट केला होता. या फोटोत महेश विघ्ने नावाची व्यक्ती दिसत असून, तीच व्यक्ती सध्या SIT मध्ये अधिकारी म्हणून आहे.