एकाच फ्रेममध्ये सगळे, संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का?; संजय राऊतांनी फोटो शेअर करत डागली तोफ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचं वातावरण तापलं आहे. त्यावरून राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला आहे. देशमुख हत्या प्रकरणात सरभाग असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड, यांच्यासोबत धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान एकत्र असल्याचा फोटो शेअर केला आहे.
एका फ्रेममध्ये सगळे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का?
मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत
ग्रामस्थ म्हणतायेत “सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे”.
अगतिक जनता pic.twitter.com/4MSWOLi3iO— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2025
एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत ग्रामस्थ म्हणतायेत “सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे”. अगतिक जनता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नवीन माहिती समोर येत आहे. याच घटनेदरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. खंडणी प्रकरणावरुनच मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे.
एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली.
पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.
ही जमीन केज येथे १,६९,००,००० २९/११/२४… pic.twitter.com/kZqVoS1BTe
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 7, 2025
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून आज त्यांनी ट्विट करुन वाल्मीक कराड याच्या वाईन शॉपचा तपशील देत गंभीर आरोप आरोप केले आहेत. दमानिया यांनी समाज सुधार वाल्मीक कराड याचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. दमानिया यांनी यासंदर्भात पुरावेही सादर केले आहेत. वाल्मीक कराड याची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनशॉप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यानंतर आता संजय राऊत यांनी वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकनाथ शिंदे आणि शिवराज सिंह चौहान यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.