Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कॅगवर देशद्रोहाचा आरोप करणार की ईडीची धाड घालणार? संजय राऊतांचा भाजप सरकारला खोचक टोला

खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत असताना कॅगने त्यांच्या अहवालातून केंद्र सरकारच्या 7 योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आता केंद्र सरकार कॅगवर इडीच्या धाडी टाकणार का, असा खोचक सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.  द्वारका, यमुना एक्सप्रेस वे यांच्या एक-एक किलोमीटरच्या कामात जे काही कोट्यवधींचे गफले झाले ते कॅगने बाहेर काढल्याने आता कॅगला देशद्रोही ठरवणार का, त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला, असा टोला लगावत खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 18, 2023 | 07:49 PM
आता कॅगवर देशद्रोहाचा आरोप करणार की ईडीची धाड घालणार? संजय राऊतांचा भाजप सरकारला खोचक टोला
Follow Us
Follow Us:

मुंबई : आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारला कॅगच्या अहवालावरून चांगलेच घेरल्याचे दिसून आले. केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस झाले आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

या योजनांवर कॅगचे आरोप

भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची तूट

आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल केंद्रावरून नोंद

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेलाया 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.

अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेचे फलक लावण्यासाठी वळवले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान

द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

Web Title: Sanjay rauts attack on bjp government they say now will the cag be charged with sedition or will the ed be raided nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2023 | 07:49 PM

Topics:  

  • Ayushman Bharat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.