मुंबई: “महाराष्ट्रातील महिला मुलींवर जो अत्याचार होत आहे, त्याचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत जावा. त्यासाठी आम्ही बंदची घोषणा केली होती. लोकशाहीत अशा आंदोलनांना मान्यता आहे. आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. पण ज्यावेळी सरकार संकटात आहे, असे दिसते त्यावेळी सरकारचा लाडका याचिकाकर्ता कोर्टात जातो आणि हा बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय देते. पण तरीही आम्ही महाविकास आघाडीचे लोक आंदोलन करणारच,” अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाने ब्रेक लावला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई, पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी मुक आंदोलन कऱण्यात येत आहे. यावर संजय राऊत यांनी राज्य सरकारसह गुणरत्न सदावर्तेंनाही टोला लगावला आहे.
हेदेखील वाचा: महाविकास आघाडीचे मुक आंदोलन; भाजप देणार आंदोलनाने प्रत्युत्तर
“आज न्यायदेवतेवरही अत्याचार होत आहे. म्हणून आमची ही लढाई आहे. कोर्टाने असा निर्णय का दिला, कोर्टाने दबावाखाली निर्णय दिला असे आम्ही म्हणू शकत नाही.शिवसेनेच्या एका खटल्यासंदर्भात तारखांवर तारखा पडत आहेत. हासुद्धा राज्य घटनेवर एकप्रकारचा बलात्कारचं आहे,’ अशी प्रतिक्रीय संजय राऊत यांनी दिली आहे.
पण त्यापेक्षाही राज्यातल्या बहिणी,मुली, भगिनींची आम्हाला चिंता आहे. म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीत आंदोलनाला फार महत्त्व आहे. जर आंदोलने नसतील तर आमचा आवाज कुणी दाबणार असेल तर लोकशाही काय कामाची, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा: नाशिकमध्ये खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग
महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. पण ती राजकीय नव्हती. राज्यात महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. हे कोर्टालाही माहिती आहेत. कोर्टानेही त्याची दखल घेतली आहे. त्यासाठी देशाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत. पंतप्रधान मोदी तर रशिया, पोलंड, युक्रेन च्या दौऱ्यावर आहेत तिथल्या समस्यांवर त्यांचे लक्ष आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.