Photo Credit- Social media
मुंबई: बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमूीवर महाविकास आघाडीकडून आज(24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने बंदला परवानगी नाकारत हा बंद झाल्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्याची भूमिका घेतली. राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार आहेत.
अशातच महाविकास आघाडीच्या आंदोलनांना भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे. – विरोधकांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चित्रा वाघ, आमदार प्रसाद लाड मुंबईत तर आमदार प्रविण दरेकर महाडच्या चवदार तळ्यावर करणार मविआचा निषेध करणार असल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा: ‘या’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली स्पेशल फोर्स; देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर
दरम्यान, बंदला परवानगी नाकारल्यानंतरही राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन. शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला असून मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
दुसरीकडे पुण्यातही पुण्यात आज महाविकास आघाडीचे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यात सहभागी होणार आहेत. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन होणार असून तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन केेले जाणार आहे. सकाळी 10 ते 11 एक तास आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.