पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याने पुणे पोलिसांना सापडत नसताना दुसरीकडे हे ड्रग्ज प्रकरण वाढत चालले आहे. गेल्यावेळी न्यायालयाने पोलिसांना फटकारले असताना आज पुन्हा न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना झापले. गुन्ह्याचे तपास अधिकारी न्यायालयात पोलीस गणवेशात हजर न राहिल्याने न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. तसेच, तुम्ही न्यायालयात गणवेश परिधान करून का हजर राहिला नाहीत, याबाबतचा खुलासा पोलीस आयुक्तांमार्फत १५ दिवसांत करावा.
पोलीस कोठडीत वाढ
खुलासा न केल्यास तुम्हाला काही सांगायचे नाही असे समजून शिस्तबंध अधिकाऱ्याकडे तुमच्यावरील कारवाईचा अहवाल पाठवला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या राज्यभर गाजत असलेल्या तसेच संवेदनशील प्रकरणात छोट्या छोट्या गोष्टीत कमी पडत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भूषण पाटील व अभिषेक बलकवडे पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ
ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
दोन कोटींचे ड्रग्स पकडले
ससून रुग्णालयाच्या गेटजवळ पुणे पोलिसांनी दोन कोटींचे ड्रग्स पकडले होते. याप्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक केली. परंतु, ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. मात्र, १५ दिवसानंतर देखील तो सापडलेला नाही. दरम्यान, ललितचा भाऊ भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना ०९ दिवसांनी अटक केली.
भूषण पाटीलच्या घरातून ८ पेन ड्राईव्ह
न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान, त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले. तेव्हा सरकारी वकिलांनी न्यायालयात आरोपींची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करीत त्यांना एमडी तयार करण्याचा फॉर्मिला कोणी शिकवला, त्याचा शोध घ्यायचा आहे. भूषण पाटीलच्या घरातून ८ पेन ड्राईव्ह मिळाले आहेत.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने १२ जणांकडे तपास
या गुन्ह्याच्या अनुषंगाने १२ जणांकडे तपास केला आहे. त्यांच्याकडून माहिती मिळत आहे. फरार आरोपी शिवाजी शिंदे याने कच्चा माल पुरवला असून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करायचे आहे तसेच फरार आरोपी नाशिकमध्ये येऊन एमडी घेऊन जात होते, त्यामुळे त्यांचा शोध घ्यायचा आहे, यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने या दोघांच्या पोलीस कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
गेल्यावेळीही पोलीस अधिकाऱ्यांना फटकारले होते…
भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हाही न्यायालयाने पोलिसाना फटकारले होते. न्यायालयाने म्हटलं होतं एखादं कटींगचं दुकान उघडल तरी पोलिसांना कळतं, जे आहे ते सांभाळता आलं नाही आता तुम्हाला १४ दिवसांची पोलीस कोठडी कशाला हवी ? असे म्हणत ललित पाटील पलायन प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यानी खोचक टिप्पणी केली होती.
Web Title: Sasoon drug case again court slaps police officers increase in police custody of bhushan patil and abhishek balakwade read detailed report nryb