Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: छताला तडे, स्लॅब गळती! कराडमधील पाल PHC च्या बांधकामात मोठा घोटाळा? काळभोर आक्रमक

Satara News : काळभोर यांनी यावेळी विजया कन्स्ट्रक्शनला विविध प्रकारची शासकीय कामे दिली जात असल्याचा आरोप केला. तसेच या संस्थेला सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रायव्हर व शिपाई सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 01:50 PM
Satara News, Karad News, Madan Kalbhor, Pal PHC Building,

Satara News, Karad News, Madan Kalbhor, Pal PHC Building,

Follow Us
Follow Us:
  • पाल (कराड) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामात गंभीर त्रुटी व निकृष्ट दर्जाचा कारभार उघड झेडपी
  • सदस्य मदन काळभोर यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप
  • आरसीसी कॉलममध्ये हनी कॉम्बिंग, जिन्याला तडे आणि स्लॅबमधून पाणीगळती होत असल्याचे पाहणीत स्पष्ट
Satara Karad News: कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामात आढळून आलेल्या त्रुटींवरून जिल्हा परिषद सदस्य मदन काळभोर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बांधकामातील त्रुटींसाठी अधिकारी आणि ठेकेदार दोघेही जबाबदार असल्याची तक्रार काळभोर यांनी केली.

या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी पाल येथे घटनास्थळी मदन काळभोर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, पाल गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी

स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती

पाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर बांधकाम विभागाच्या पत्रात RCC कॉलममध्ये Honey Combing, RCC भागात तडे, स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती तसेच जिन्याला तडे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काळभोर यांनी यावेळी विजया कन्स्ट्रक्शनला विविध प्रकारची शासकीय कामे दिली जात असल्याचा आरोप केला. तसेच या संस्थेला सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रायव्हर व शिपाई सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधा ड्रेसदेखील देण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

“ज्या ठेकेदाराकडून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत, अशा ठेकेदाराला वारंवार विविध कामे का दिली जातात?” असा सवाल उपस्थित करत काळभोर यांनी अशा ठेकेदारांना भविष्यात शासकीय कामे देऊ नयेत, अशी मागणी केली.

दरम्यान, “माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये भविष्यात विजया कन्स्ट्रक्शनला कोणतेही काम देण्यात येणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मदन काळभोर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे

दुरुस्तीवरही काळभोरांचा आक्षेप

स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या अहवालानुसार इमारतीची NDT चाचणी करण्यात आली असून काही भागात दुरुस्तीच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. आराखड्यात काही भागातील स्लॅब पुनर्बांधणी तसेच काही भागात Low Viscosity Epoxy Bonding आणि Injection Grouting करण्याची उपाययोजना दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दुरुस्ती करून प्रकरण संपविण्याऐवजी बांधकामातील त्रुटी नेमक्या का निर्माण झाल्या, त्यासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची भूमिका काळभोर यांनी घेतली.

पालसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामात गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले असून दर्जेदार काम न झाल्यास प्रसंगी पाल गावातून ग्रामस्थ मोठा उठाव करतील यामुळे ग्रामस्थांनी व मदन काळभोर यांनी उपस्थित केलेल्या आरोपांवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Satara newsmadan kalbhor allegations on vijaya construction pal phc building karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.