Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयाचा सोसायट्यांना झाला फायदा, सोलर पॅनलमधून वीजनिर्मितीमुळे हजारो रुपयांची बचत

कल्याण डोंबिवली परिसरातील ३७ इमारतींची सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मितीमुळे वीज बिलामध्ये (Electricity Bill) दरमहिना हजारो रुपयांची बचत होत आहे.

  • By साधना
Updated On: Jan 02, 2023 | 08:00 PM
solar panel in society

solar panel in society

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या नवीन इमारती किंवा गृहसंकुलांना २००७ पासून सोलर वॉटर हीटर बसवणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बंधनकारक केले आहे. केडीएमसीच्या या निर्णयाचे आता वर्षभरानंतर सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील ३७ इमारतींची सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मितीमुळे वीज बिलामध्ये (Electricity Bill) दरमहिना हजारो रुपयांची बचत होत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १ हजार ८१४ इमारतींवर दर दिवसाला १ कोटी लीटर क्षमतेचे सोलर वॉटर हीटर (Solar Water Heater) बसवण्यात आले असून त्याद्वारे दरवर्षी तब्बल १८ कोटी युनिट वीज बचत होत असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

[read_also content=”रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण आयुक्तपदी बदल, सरकारी आदेश जारी https://www.navarashtra.com/maharashtra/transfer-of-raigad-collector-dr-mahendra-kalyankar-as-kokan-commissioner-nrsr-358753.html”]

केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरापासून नव्या इमारतींवर सोलर वॉटर हीटर यंत्रणेऐवजी सौरऊर्जा निर्मिती संयंत्र बसवणे बंधनकारक केले असल्याचे प्रशांत भागवत यांनी सांगितले. या निर्णयानुसार गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत ३७ नव्या इमारतींवर सौरऊर्जा निर्मिती संयंत्र बसविण्यात आली आहेत. प्रत्येकी ५०० किलोवॉट वीजनिर्मिती क्षमतेचे हे प्रकल्प नेट मीटरींगद्वारे महावितरणशी जोडण्यात आले आहेत.

या सौर ऊर्जा प्रकल्पातून दर दिवशी दोन हजार युनिट इतकी वीजनिर्मिती होत असून त्यामूळेच वीज बिलांमध्ये या इमारती आता दरमहिना सुमारे २५ ते ३० हजार रुपयांची बचत करत असल्याची माहितीही भागवत यांनी दिली. सौर उर्जेद्वारे जितकी जास्त वीज निर्मिती तितका महावितरणवरील भार हलका होण्यास मदत होत असल्याने येत्या काळात त्यात वाढ होऊन एक मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प परिणामकारकपणे राबवण्याची जबाबदारी विद्युत विभागावर सोपवण्यात आली आहे. आणि विद्युत विभागातील अभियंत्यांची पथके हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत असल्यानेच हे सकारात्मक चित्र दिसत असल्याची प्रतिक्रीया कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. तसेच या प्रकल्पाचे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणा म्हणजेच मेडा समोरही सादरीकरण करण्यात आले असून राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीही अशा प्रकारे अंमलबजाणी केल्यास ऊर्जा बचतीमध्ये मोठा हातभार लागेल असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी केडीएमसी विद्युत विभागाने कंबर कसली असून पथनाट्याच्या माध्यमातुन लोक जागर केला जात आहे. आतापर्यंत विविध २३ ठिकाणी ही पथनाट्य सादर करण्यात आली असून येत्या मार्चपर्यंत १०० पथनाट्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्याद्वारे या ऊर्जा बचतीच्या आणि सौर ऊर्जेच्या वापरामध्ये अधिकाधिक नागरिक पुढाकार घेतील अशी प्रतिक्रियाही प्रशांत भागवत यांनी दिली.

Web Title: Saving in electricity bill due to solar panel usage in society of kalyan dombivali nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 07:59 PM

Topics:  

  • kalyan dombivali news

संबंधित बातम्या

Kalyan building Collapse : कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती
1

Kalyan building Collapse : कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती

KDMC News : MIDC परिसरात नाल्यांची दुरावस्था; अधिकाऱ्यांवर करावाई करा, शिवसेना आमदाराचं उदय सामंतांना पत्र
2

KDMC News : MIDC परिसरात नाल्यांची दुरावस्था; अधिकाऱ्यांवर करावाई करा, शिवसेना आमदाराचं उदय सामंतांना पत्र

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई
3

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई

रेरा फसवणूक प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, “रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी सरकार ठाम…”
4

रेरा फसवणूक प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, “रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी सरकार ठाम…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.