Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही माझी शेवटची निवडणूक, पण माझी मुलगी राजकीय वारसदार नाही; महाराष्ट्रातील बड्या नेत्याची निवृत्तीची घोषणा

सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ही माझी शेवटची निवडणूक असेल, लवकरच माझा राजकीय वारदार ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 17, 2024 | 05:43 PM
ही माझी शेवटची निवडणूक, पण माझी मुलगी राजकीय वारदार नाही; महाराष्ट्रातील बड्या नेत्याची निवृत्तीची घोषणा

ही माझी शेवटची निवडणूक, पण माझी मुलगी राजकीय वारदार नाही; महाराष्ट्रातील बड्या नेत्याची निवृत्तीची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तुळस येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल, माझी मुलगी सोनाली माझा राजकीय वारसदार नाही, लवकरच माझा वारसदार ठरेल, असं म्हणत त्यांनी ऐन निवडणुकीत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्य रिंगणात उतरवलं आहे. काल दिपक केसरकर यांची सभा पार पडली. या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

देशात चुकीची परंपरा झाली आहे, खोटं बोलून नेरेटीव्ह सेट केलं जात आहे. गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केलं जात होतं. मी गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात, साईबाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अन्यथा उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.

शिवसेनेसंर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाची स्थिती काय होती. त्यावेळी किती मताधिक्य होतं ते जाणून घेण्याची गरज आहे. नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं. विधानपरिषदेत आठ वेळा बजेट सादर केलं. मात्र जी युती बाळासाहेबांनी निर्माण केली, ती युती सिंधुदुर्गात मोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. बजेट सादर करताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला निधी दिला, मात्र उद्धव ठाकरे आपण निधी दिल्याचं सांगत आहेत. निविदा मिळवण्यासाठी बाऊन्सर घेऊन फिरणारे उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत, त्यांच्यापासून सावध रहा, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. जर उद्धव ठाकरे यांना मराठीचा अभिमान होता, तर मराठी संवर्धन करायची कार्यालये मुंबईच्या बाहेर का गेली? ती सर्व कार्यालये मी पुन्हा मी मुंबईमध्ये आणल्याचा दावा त्यांनी केला. तसंच यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली होती.

दरम्यान आज तुळस येथे पत्रकार परिषदेतही त्यांनी, ही आपली शेवटची निवडणूक असेल मात्र माझी मुलगी वारदार असणार नाही. लवकरच माझा राजकीय वारस ठरेल असेल, असं सूचक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केसरकर यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे चर्चांना इधाण आलं आहे.

Web Title: Sawantwadi constituency mahayuti candidate shiv sena leader deepak kesarkar announce political retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Election

संबंधित बातम्या

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
1

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
2

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?
3

ZP Elections2025: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आरक्षण पद्धत; काय आहे नवा फॉर्म्युला?

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
4

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.