Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना आज पुन्हा सुट्टी; प्रशासनाचा निर्णय

पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2024 | 08:43 AM
मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना आज पुन्हा सुट्टी

मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना आज पुन्हा सुट्टी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यासह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये पावसाने तूफान बॅटिंग केली आहे. असे असताना हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर आता या भागांतील शाळा गुरुवारी (दि.25) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

लोणावळा परिसरातही जोरदार पाऊस

लोणावळा आणि परिसरात तूफान पाऊस होत आहे. या भागात तर ढगफुटीसदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचले होते. याच पाण्यामुळे मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. या पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले आहे.

Web Title: Schools and colleges closed due to heavy rain in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 08:43 AM

Topics:  

  • School Closed

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.