Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंकलखोप (औदुंबर) गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड; सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना शासन राबवित आहे. पुणे महसूल विभागात सांगलीच्या अंकलखोप (औदुंबर) ची पुस्तकाचे गाव म्हणून निवड करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2022 | 08:16 PM
books

books

Follow Us
Close
Follow Us:

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना शासन राबवित आहे. पुणे महसूल विभागात सांगलीच्या अंकलखोप (औदुंबर) ची पुस्तकाचे गाव म्हणून निवड करण्यात आली असून, हा सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे मत मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.

पुस्तकाच्या गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन पर ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार आहेत. “पुस्तकाचे गाव” म्हणून लवकरच अंकलखोप (औदुंबर) ता. पलुस ची ओळख राज्याबरोबरच देशभरात होण्यासाठी मदत होणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल, असा विश्वास राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरू करीत असताना सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील अंकलखोप (औदुंबर) या गावाची निवड करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्याकडून सदर प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्याबाबत मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सदर विषयावर काल विधान भवन येथील दालनात बैठक घेऊन निर्देश दिले होते.

पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी शासन निर्णयाव्दारे आज औरंगाबाद महसूल विभागात वेरूळ जि. औरंगाबाद, नागपूर विभागात नवेगाव बांध, जि. गोंदिया, कोकण विभागात पोंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग व पुणे विभागात अंकलखोप (औदुंबर) या गावात पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

“हे ऑन वे” वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना अस्तित्वात आली असून, या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार तसेच वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी. तसेच भाषेची आवड, योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील नाविन्यपूर्ण पुस्तकांचे गाव अंकलखोप (औदुंबर) येथे होणार असल्याची माहिती मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

Web Title: Selection of ankalkhop audumbar as a village of books manacha tura in the crown of sangli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2022 | 08:16 PM

Topics:  

  • Dr. Vishwajeet Kadam

संबंधित बातम्या

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
1

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचं निधन; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.