पुणे : पुण्यातील स्वारगेट (Swargate) परिसरामध्ये भीषण घटना घडली आहे. शिवशाही बसच्या (Shivshahi Bus) धडकेमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. स्वारगेट परिसरातील देशभक्त जेधे चौकामध्ये हा अपघात (Pune Accident Case) झाला असून या प्रकरणी बसचालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) गुन्हा दाखल केला.
स्वारगेट येथील देशभक्त जेधे चौकामध्ये वृद्ध महिला पादचारी मार्गाने चालल्या होत्या. नंतर त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आल्या असता त्यांना शिवशाही बसने धडक दिली. या अपघातामध्ये जेष्ठ महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र त्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
कस्तुरीबाई रतनलाल राठोड (वय 75) असे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवशाही बसचालक करण प्रकाश बहादुर (वय 32,रा. गार्निश बिल्डींग, आंबेगाव पठार, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राठोड यांची नात सोनाली रवींद्र पुजारी (वय 33, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.