
BJP MLA threat call
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा खोपडे आज विधीमंडळात प्रवेश करत असताना त्यांना धमकीचे कॉल आले. खोपडे विधीमंडळात तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार होते. तुकाराम मुंढे यांनी नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीरपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता. तुकाराम मुंढे यांच्याकडे कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प”चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झाली नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे प्रभार घेतल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे, भाजपने तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कृष्णा खोपडे यांना आज सकाळी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे कॉल आल्याचे सांगितले. विधिमंडळात प्रवेश करण्यापूर्वीच हे कॉल आल्याने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. खोपडे यांनी या संदर्भातील सर्व माहिती विधिमंडळ सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला देण्याची तयारी केली असून, त्यानंतर अधिकृत पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते. सध्या या प्रकरणाचा तपास करण्यात येणार असून, धमकीमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
Explainer: “वंदे मातरम्- राष्ट्रभावना की राजकीय अजेंडा?” इतिहासापासून वादापर्यंत जाणून घ्या सर्वकाही
भाजपाचे नेमके आरोप काय?
भाजपाच्या मते, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गंभीर गैरव्यवहार केले.
नियमबाह्य पेमेंटचा आरोप:
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या काळात काही निवडक कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची देयके नियमबाह्य पद्धतीने मंजूर केल्याचा भाजपाचा दावा आहे.
अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप:
काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली, गैरवर्तन केले, असेही आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत.
एफआयआर असूनही कारवाई न झाल्याचा आरोप:
या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या काळात पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारकडून दबाव आल्याने मुंढे यांच्यावर आवश्यक कारवाई होऊ शकली नाही, असा आरोप भाजपाचे.
भाजपचे आमदार आता ही जुनी प्रकरणे पुन्हा उकरून मुंढे यांच्या निलंबनाची मागणी विधिमंडळात मांडणार असल्याची माहिती आहे.